मृदा दिनानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 18:09 IST2020-12-09T18:04:08+5:302020-12-09T18:09:06+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील एकमेव केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद याठिकाणी जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इगतपुरी तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मृदा आणि जल यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

टाकेद येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना भास्कर गिते. समवेत ताराबाई बांबळे, रामचंद्र परदेशी, किशोर भरते, संजय पाटील, जयश्री गांगुर्डे, दीपा शिंदे आदींसह शेतकरी.
घोटी : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील एकमेव केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद याठिकाणी जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इगतपुरी तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मृदा आणि जल यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
इगतपुरी तालुक्यातील कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी भास्कर गिते यांनी शेतकऱ्यांना मृदा, मृदेची सुपिकता, मृदेतील पिकांना पोषक असलेली घटक यासंदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच तारा बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, कृषी पर्यवेक्षक किशोर भरते, संजय पाटील, कृषी सहायक जयश्री गांगुर्डे, दीपा शिंदे, कृषिमित्र जगन घोडे, सतीश जाधव, सागर दवंडे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.