कृषी विभागातील तज्ञांकडुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 14:35 IST2020-07-04T14:34:52+5:302020-07-04T14:35:25+5:30
उमराणे : कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्र मांतर्गत कृषी विभाग आत्मा तर्फे तिसगाव (ता. देवळा) येथील नोंदणीकृत किसान शेतकरी बचत गटातील शेतकऱ्यांना कृषी विभागातील तज्ञ व अधिकारींकडुन शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

तिसगाव ता. देवळा येथील नोंदणीकृत किसान शेतकरी बचत गटाच्या शेतकºयांना शेतीविषयक माहिती देताना कृषीतज्ञ अधिकारी.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमराणे : कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्र मांतर्गत कृषी विभाग आत्मा तर्फे तिसगाव (ता. देवळा) येथील नोंदणीकृत किसान शेतकरी बचत गटातील शेतकऱ्यांना कृषी विभागातील तज्ञ व अधिकारींकडुन शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कृषी विभागाच्या विविध योजनांबद्दल माहीती देत मका पीक लागवड क्षेत्राला भेट देऊन लष्करी अळी निर्मुलन व्यवस्थापन, फळबाग लागवड, पिक विमा इत्यादी विषयावर देवळा तालुका कृषीअधिकारी सचिन देवरे यांनी माहिती दिली.
त्याचबरोबर डाळिंब पिक व्यवस्थापनात खते, ओषधे, जैविक बुरशीचा वापर, निर्यातीसाठी च्या अटी शर्ती व आॅनलाईन नोंदणी, शेतमाल खरेदी-विक्र ी व्यवस्थापन, शेतकरी गट, शेतकरी शेतमाल उत्पादक कंपनी नोंदणी या विषयी कृषीतज्ञ महेंद्र पवार, प्रविण ठाकरे, महेश देवरे यांनी माहिती दिली. यावेळी कृषी सहाय्यक एच. डी. ढवळे, कृषी पर्यवेक्षक पी. एस. कंखर,सोमनाथ जाधव, राजु जाधव, कैलास जाधव आदी उपस्थित होते.