शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

गुढीपाडव्याचा जल्लोष : नाशिकमध्ये स्वागतयात्रांचा उत्साह; महिलांचा लक्षणीय सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 21:03 IST

चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा शहर व परिसरात जल्लोषपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. नागरिकांनी आपापल्या घरांवर गुढी उभारून हिंदू नववर्ष साजरा केला.

ठळक मुद्देढोल-ताशांच्या गजरात रस्त्यांवरून स्वागतयात्रांचा जल्लोष शहरातून तब्बल पंधरा ते वीस ठिकाणांहून स्वागतयात्रा निघाल्या

नाशिक : भल्या सकाळी रांगोळ्या आणि पताक्यांनी सजविलेले रस्ते, त्यानंतर ढोल-ताशांच्या निनादात ब्रह्मध्वज नाचवत निघालेले तरुण आणि पारंपरिक वेशभूषेत असलेल्या महिलांचे नृत्य अन् मर्दानी खेळ... विविध रस्त्यांवरून निघालेल्या स्वागतयात्रांमुळे नाशिककरांनी रविवारी (दि.१८) आगळीवेगळी उत्साहवर्धक सकाळ अनुभवली.चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा शहर व परिसरात जल्लोषपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. नागरिकांनी आपापल्या घरांवर गुढी उभारून हिंदू नववर्ष साजरा केला. रविवारपासून शालिवाहन शके १९४०ला प्रारंभ झाला. गुढीपाडव्याच्या सणानिमित्त शहरातील विविध भागांमध्ये पारंपरिक स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दिनकराच्या साक्षीने ढोल-ताशांच्या गजरात रस्त्यांवरून स्वागतयात्रांचा जल्लोष पहावयास मिळाला.घरोघरी गुढ्या उभारून आणि तोरणे बांधून दरवर्षीच हिंदू नववर्षाचा प्रथम दिन साजरा केला जातो. परंतु गेल्या काही वर्षांनी शहराच्या विविध भागांत पारंपरिक वेशभूषेत निघणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रा, त्यात सहभागी धार्मिक संस्था आणि आधुनिकतेची कास धरत निघणा-या दुचाकीफे-या यामुळे वातावरणाचा नूरच बदलून जातो. पाडव्याचा दिवस, त्यातच रविवारची सुटी असल्याने शहरातून तब्बल पंधरा ते वीस ठिकाणांहून स्वागतयात्रा निघाल्या. भद्रकालीतील साक्षी गणेश, इंदिरानगर, गंगापूररोड, सातपूर, कॉलेजरोडवरील कुलकर्णी चौक अशा विविध ठिकाणी निघालेल्या यात्रांनी शहराच्या उत्सवी वातावरणात उत्साहाची भर घातली. पारंपरिक वेशभूषेत ब्रह्मध्वज खांद्यावर घेऊन निघालेल्या पुरुष मंडळीबरोबरच महिलाही सहभागी झाल्या होत्या. लेजीम पथके, ढोल पथके, महापुरुषांच्या वेशभूषेतील युवक, बालकांनी लक्ष वेधून घेतले.

रविवार कारंजा परिसरात जल्लोषनववर्ष स्वागतयात्रा समितीकडून स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मागील चार वर्षांपासून या भागातून स्वागतयात्रा काढण्याची परंपरा पाळली जात आहे. राज्य सराफ सुवर्ण महासंघाचे गिरीश टकले, अ‍ॅड. नितीन बाबूराव ठाकरे यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. साक्षी गणपती मंदिरापासून यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यात्रा गाडगे महाराज पुतळा, मेनरोडने धुमाळपॉर्इंटवरून रेडक्रॉस सिग्नल, एम.जी. रोडवरून वकीलवाडी, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मेनरोडवरून चांदवडकर लेन, दिल्ली दरवाजामार्गे भाजी पटांगणावर पोहचली. या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे १ कि.मी. रांगोळी. यात्रा मार्गावर सहभागी महिला रांगोळी काढत होत्या. विविध धार्मिक-सांस्कृतिक संस्थांचे एकूण १५ चित्ररथ यात्रेत सहभागी झाले होते. ढोलवादन, मंगळागौर खेळ, दुचाकीस्वार महिलांनी लक्ष वेधले.

टॅग्स :gudhi padwaगुढी पाडवाNashikनाशिक