शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

जीएसटी अनुदानात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 1:19 AM

देशभर ‘जीएसटी’च्या माध्यमातून एकच करपद्धती अंमलात आल्यानंतर महापालिकेला दरमहा ७३.४० प्राप्त होत होते. मात्र, राज्य शासनाकडून मार्च महिन्याच्या अनुदानात ५३ कोटी ६६ लाख रुपये कपात करून महापालिकेच्या हाती केवळ १९ कोटी ७४ लाख रुपये टेकविले आहेत. त्यामुळे, मार्चअखेरपर्यंत उत्पन्नाचा आलेख उंचावण्यासाठी धडपड करणाºया महापालिकेला झटका बसला आहे.

नाशिक : देशभर ‘जीएसटी’च्या माध्यमातून एकच करपद्धती अंमलात आल्यानंतर महापालिकेला दरमहा ७३.४० प्राप्त होत होते. मात्र, राज्य शासनाकडून मार्च महिन्याच्या अनुदानात ५३ कोटी ६६ लाख रुपये कपात करून महापालिकेच्या हाती केवळ १९ कोटी ७४ लाख रुपये टेकविले आहेत. त्यामुळे, मार्चअखेरपर्यंत उत्पन्नाचा आलेख उंचावण्यासाठी धडपड करणाºया महापालिकेला झटका बसला आहे.महाराष्टÑ वस्तू व सेवा कर कायदा १ जुलै २०१७ पासून अंमलात आला. त्यामुळे, केंद्र व राज्य शासनाकडून महापालिकेला दरमहा भरपाई अनुदान दिले जात आहे. नाशिक महापालिकेला दरमहा ७३ कोटी ४० लाख रुपयांचे अनुदान वितरित केले जात आहे. महिना सुरू होण्यापूर्वीच सदर अनुदान महापालिकेच्या बॅँक खात्यात जाऊन पडत होते. त्यामुळे, शासन अनुदानाबाबत महापालिका निर्धास्त होती. सदर अनुदानासाठी महापालिकेला हात पसरण्याची वेळ आली नाही. मात्र, मार्च महिन्याचे अनुदान वितरित करताना शासनाने त्यात मोठी कपात करत झटका दिला आहे. मार्च महिन्याचे अवघे १९ कोटी ७४ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. शासनाने ५३ कोटी ६६ लाख रुपयांची कपात केली आहे. मार्चअखेर उत्पन्नाची जमा बाजू सक्षम करण्यासाठी नवनियुक्त आयुक्तांनी कठोर पावले उचलली आहेत. त्यासाठी घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीवर भर दिला जात आहे. परंतु, वर्षाच्या शेवटच्या महिन्यात शासनाने मोठी कपात करत झटका दिल्याने उत्पन्नाचा ताळमेळ बसणे अवघड होऊन बसणार आहे.जादा रकमेची वसुलीराज्य शासनाने ज्यावेळी एलबीटीचे अनुदान बंद केले त्याचवेळी नाशिक महापालिकेला सुमारे ६९ कोटी रुपये जादा प्राप्त झालेले होते. परंतु, सदर रकमेबाबत शासनाकडून मागणी झालेली नव्हती. त्यामुळे महापालिकेने सदर रकमेची मुदतठेव ठेवलेली आहे. आता मार्च महिन्यात अनुदानात कपात करत शासनाने सदर जादा रकमेचीच वसुली केल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे, महापालिकेच्या कामकाजावर फारसा फरक पडणार नसल्याचा दावा केला जात आहे.

टॅग्स :GSTजीएसटीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका