शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

जीएसटीमुळे विडी कामगारांवर ‘संक्रांत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:34 PM

विडी उत्पादनावर २८ टक्के जीएसटी आकारण्यात आल्याने कारखानदारांनी उत्पादन कमी केले असून, त्याचा परिणाम कामगारांच्या वेतनावर झाल्याने त्यांच्यावर आर्थिक अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे, तर विडी उद्योग धोक्यात आला आहे. विडी उत्पादनावर २८ टक्के जीएसटी लागू झाल्यापासून विडी विक्रीवर विपरित परिणाम झाला आहे.

सिन्नर : विडी उत्पादनावर २८ टक्के जीएसटी आकारण्यात आल्याने कारखानदारांनी उत्पादन कमी केले असून, त्याचा परिणाम कामगारांच्या वेतनावर झाल्याने त्यांच्यावर आर्थिक अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे, तर विडी उद्योग धोक्यात आला आहे.विडी उत्पादनावर २८ टक्के जीएसटी लागू झाल्यापासून विडी विक्रीवर विपरित परिणाम झाला आहे. कारखानदारांनी उत्पादनही कमी केले आहे. उत्पादन कमी झाल्यामुळे कामगारांवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यातून विडी कामगार आर्थिक अडचणी सापडला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास विडी कामगारांवर उपासमारीची वेळ  येऊ शकेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. विडी उत्पादनावर आकारण्यात येणारा जीएसटी ५ टक्के करावा, अशी मागणी सिन्नर तालुका विडी कामगार संघाकडून करण्यात येत आहे.  तेंदूपत्ता, तंबाखूवरील जीएसटी रद्द करावा, विडी कामगारांना एक हजार विडीकरिता ६०० रुपये वेतन निश्चित करून महागाईभत्ता लागू करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार नितीन गवळी यांना विडी कामगार संघाकडून देण्यात आले.  केंद्र सरकारने जुन्या ५०० व हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर विडी कामगारांची मजुरी थेट त्याच्या बँक खात्यावर जमा होऊ लागली आहे. विडी कारखानदार कामगारांना पुरवित असलेल्या तेंदुपत्त्यात एक हजार विड्याही वळल्या जात नाहीत. त्यासाठी विडी कामगारांना पाने विकत घ्यावी लागतात.  त्याचा फटका कामगारांनाच बसत असून, पानांची भरपाई म्हणून दर आठवड्यास १ किलो जादा पानपुडे मिळावेत, अशीही मागणी विडी कामगार संघाचे अध्यक्ष म्हाळू पवार, नारायण आडणे, बालाजी साळी, रेणुका वंजारी, परिघाबाई थोरात, शांताराम रेवगडे, रामदास पाटोळे यांच्यासह विडी कामगारांनी केली आहे. धान्य पुरवठा सुरू करण्याची मागणी विडी कामगार आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचे मान्य करीत तेलंगणा राज्य सरकारने विडी कामगारांना जीवनभृती आधार भत्ता अनुदान लागू केले आहे. महाराष्ट्र सरकारनेही याच धर्तीवर येथील कामगारांना दरमहा एक हजार रुपये अनुदान सुरू करावे. विडी कामगारांना एपीएल शिधापत्रिकेद्वारे स्वस्त दरात केला जाणारा धान्य पुरवठा २०१४ पासून बंद केला असून, तो पुन्हा सुरू करावा. या शिधापत्रिकाधारक कामगारांना ७ रुपये २० पैसे दराने ३ किलो गहू, १० रुपये किलो दराने माणसी दोन किलो तांदूळ असे धान्य मिळत होते. त्यातून कामगारांच्या संसाराला मदत होत होती. मात्र ही योजनाच बंद झाल्याने कामगारांना बाजारातून हे धान्य खरेदी करावे लागत आहे. त्यातून कामगारांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे एपीएल कार्डावरील स्वस्त धान्य पूर्वीप्रमाणेच पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. खासदार भगतसिंग कोशियरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विडी कामगारांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन व महागाईभत्ता देण्याची शिफारस केली आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने करून विडी कामगारांना दरमहा ६५०० रु पये पेन्शन लागू करावी, अशी मागणी विडी कामगार संघाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Smokingधूम्रपानNashikनाशिक