‘ग्रुप स्टडी’ हाच यशाचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:26 IST2020-08-19T23:32:14+5:302020-08-20T00:26:12+5:30

नाशिक : स्पर्धा परीक्षेची तयारी का करतो, असा प्रश्न स्वत:ला पडायला हवा. त्याचे उत्तर शोधल्यास, करिअरचा मार्ग सापडतो. पुढे ' ग्रुप स्टडीच्या माध्यमातून परीक्षेची तयारी केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन कल्याण-डोबिंवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनीकेले.

Group study is the key to success | ‘ग्रुप स्टडी’ हाच यशाचा मार्ग

कॉलेज रोड, गंगापूर रोड वाणी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित शिक्षणविश्व या आॅनलाईन कार्यक्रमाच्या दिपप्रज्वलनाप्रसंगी नितीन दहीवलकर, सचीन बागड, राजेश कोठावदे, दिपक बागड, योगेश राणे व योगेश मालपुरे आदी.

ठळक मुद्देसुर्यवंशी : वाणी मित्र मंडळाच्या ‘शिक्षण विश्व’ मध्ये प्रतिपादन

नाशिक : स्पर्धा परीक्षेची तयारी का करतो, असा प्रश्न स्वत:ला पडायला हवा. त्याचे उत्तर शोधल्यास, करिअरचा मार्ग सापडतो. पुढे ' ग्रुप स्टडीच्या माध्यमातून परीक्षेची तयारी केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन कल्याण-डोबिंवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनीकेले.
कॉलेज रोड, गंगापूर रोड वाणी मित्र मंडळाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या शिक्षणविश्व या कार्यक्रमात आॅनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमात चाणक्य मंडळ परिवाराचे संचालक डॉ.अविनाश धर्माधिकारी, मुंबई येथील जीएसटी विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश कोठावदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
बऱ्याचदा अपयश आल्यास आपण खचून जातो, मात्र मित्रांनीबळ दिल्यास पुन्हा आपण जोमाने यशाच्या मागे लागतो , त्यातूनच निश्चित ध्येय गाठतो असेही डॉ. सूर्यवंशी म्हणाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष योगेश राणे, संस्थापक अध्यक्ष नितीन दहिवेलकर, विश्वस्त योगेश मालपुरे, दिपक बागड, सुनील फरांदे, नंदकिशोर कोठावदे, संजय शिरूडे, महेश उदावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरचिटणीस महेश पितृभक्त, उपाध्यक्ष संजय दुसे, संजय बागड, चिटणीस राजेंद्र कोठावदे, खजिनदार निलेश मकर, हितेश देव, भगवंत येवला, ?ड. देवदत्त सायखेडकर व संचालक मंडळाने विशेष प्रयत्न केले.डॉ. अविनाश धर्माधिकारी म्हणाले की, स्वत:ला ओळखून क्षेत्र निवडायला हवे, निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत व्हावे हेच स्वत:च्या जडणघडणीचे सूत्र आहे. त्यामुळे कागदवरचे गुण म्हणजे बुद्धीमत्ता असे म्हणता येणार नाही, असे डॉ. धर्माधिकारी यांनी सांगितले. तर निलेश कोठावदे यांनी एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षांची माहिती दिली. समाजसेवेऐवजी नोकरीचे साधन म्हणून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे बघायला हवे, असे ते म्हणाले.

Web Title: Group study is the key to success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.