सोनांबेत आजी-माजी सैनिकांकडून किराणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 23:50 IST2020-04-26T23:50:31+5:302020-04-26T23:50:42+5:30
सोनांबे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने परिसरातील गरीब, गरजू कुटुंबांना अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

सोनांबेत आजी-माजी सैनिकांकडून किराणा
सोनांबेत आजी-माजी सैनिकांकडून किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
सिन्नर : सोनांबे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने परिसरातील गरीब, गरजू कुटुंबांना अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सोनांबे गावातून सुमारे २०० हून अधिक जवान, अधिकारी देशसेवेत कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन सुरु असल्याने या काळात ग्रामीण भागात गरीब, रोजंदारी करणारे शेतमजूर, छोटे-मोठे व्यावसायिकांचे हाल होत आहे. अनेक कुटूंबांवर अक्षरश: उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
देशसेवेत कर्तव्यतत्पर असलेल्या आजी-माजी सैनिकांनी संघटनेच्या माध्यमातून परिसरातील गरीब व गरजूंना किमान आठवडाभर पुरेल एवढे धान्य, किराणा साहित्य घरोघरी जाऊन वाटप केले. त्यात एकूण ६० कुटुंबांना प्रत्येकी दोन किलो साखर, दोन लिटर तेल, चहा पावडर, एक किलो तूरडाळ, एक किलो रवा, एक किलो पोहे, लाइफबॉय साबण आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.