वैनतेय विद्यालयात अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 23:48 IST2021-06-26T23:47:21+5:302021-06-26T23:48:31+5:30
निफाड : येथील वैनतेय विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित तयार केलेल्या भित्तीपत्रकाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित एस.पी. गोरवे, बी.आर. सोनवणे, एम.एस. माळी, एन.डी. शिरसाट, जी.एस. पवार, भूषण सोनवणे आदी.
ठळक मुद्दे भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.
निफाड : येथील वैनतेय विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य एस.पी. गोरवे, उपप्राचार्य बी.आर. सोनवणे, पर्यवेक्षक एम.एस. माळी, पर्यवेक्षक एन.डी. शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी, प्राचार्य गोरवे यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक जी.एस. पवार यांनी केले. याप्रसंगी कल्पेश खैरनार यांनी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर माहिती सांगितली. प्रियाणी सोनवणे या विद्यार्थिनीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.