मालेगाव शहर परिसरात राजमाता जिजाऊ - विवेकानंदांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:36 IST2021-01-13T04:36:37+5:302021-01-13T04:36:37+5:30

शहरातील आरबीएच कन्या विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या अलका जोंधळे होत्या. यावेळी ऑनलाइन वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. दाभाडी येथील ...

Greetings to Rajmata Jijau - Vivekananda in Malegaon city area | मालेगाव शहर परिसरात राजमाता जिजाऊ - विवेकानंदांना अभिवादन

मालेगाव शहर परिसरात राजमाता जिजाऊ - विवेकानंदांना अभिवादन

शहरातील आरबीएच कन्या विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या अलका जोंधळे होत्या. यावेळी ऑनलाइन वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. दाभाडी येथील के. जे. निकम विद्यालयातर्फे आयोजित तालुका स्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धेत बक्षीसे मिळविणाऱ्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. प्रेरणा रामकृष्ण कडलग - इयत्ता ९ वी हिने चित्रकला प्रथम क्रमांक पटकावला. प्राचार्य जोंधळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपप्राचार्य कीर्ती पवार, नूरजहा शेख प्रमुख पाहुणे होत्या. सूत्रसंचालन माधवी नेरकर यांनी केले. वैशाली पाटील यांनी आभार मानले.

फोटो फाईल नेम : १२ एमजेएएन ०६ . जेपीजी

फोटो कॅप्शन : आरबीएच कन्या विद्यालयात मार्गदर्शन करताना प्राचार्य अलका जोंधळे.

-----

भारत विद्यालय

कॅम्पातील भारत विद्यालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक कल्पना अहिरे होत्या. यावेळी बाळू सूर्यवंशी, नंदलाल पवार यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन सुनंदा शिंदे यांनी केले तर आभार रोहिणी रौंदळ यांनी मानले.

फोटो फाईल नेम : १२ एमजेएएन ०७ . जेपीजी

फोटो कॅप्शन : कॅम्पातील भारत विद्यालयात प्रतिमा पूजनप्रसंगी मुख्याध्यापिका कल्पना अहिरे, बाळू सूर्यवंशी, नंदलाल पवार, सुनंदा शिंदे आदि.

----

सेवा इंग्लिश स्कूल खाकुर्डी

मालेगाव : तालुक्यातील खाकुर्डी येथील सेवा इंग्लिश स्कूल माध्यमिक विद्यालयातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक टी. जी. अहिरे होते. यावेळी उपशिक्षक पी. जी. सूर्यवंशी, आर. बी. निकम, एस. टी. देवरे, डी. बी. देवरे यांची भाषणे झाली. मुख्याध्यापक अहिरे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व्ही. व्ही. कांबळे यांनी केले. आभार आर. बी. बोरसे यांनी मानले.

-----

शिवनेरी चौक, दाभाडी

दाभाडी : येथील शिवनेरी चौकात मराठा महासंघ व शिवनेरी मित्र मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात मंगेश निकम, दीपक निकम, विशाल गोसावी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास अमोल निकम, हरिदादा निकम, सुनील सोनवणे, गौरव निकम, तुषार कापडणीस आदि उपस्थित होेते.

फोटो फाईल नेम : १२ एमजेएएन १० . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे शिवनेरी चौकात आयोजित कार्यक्रमात प्रतिमा पुजनप्रसंगी दीपक निकम, मंगेश निकम, विशाल गोसावी, अमोल निकम, तुषार कापडणीस आदि.

----

केबीएच विद्यालय

पाटणे : मालेगाव कॅम्पातील केबीएच विद्यालयातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल पवार होते. यावेळी उपप्राचार्य सुनील बागूल, रवींद्र शिरोडे, निवृत्ती निकम, विलास पगार, संतोष सावंत, के. डी. शेवाळे, पुष्पा वाघ, आर. डी. शेवाळे, प्रफुल्ल निकम यांनी प्रतिमा पूजन केले. दहावीचा विद्यार्थी अक्षय बच्छाव याचे भाषण झाले. के. डी. शेवाळे, प्राचार्य पवार, यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेश धनवटे यांनी केले. आभार राजेंद्र शेवाळे यांनी मानले.

फोटो फाईल नेम : १२ एमजेएएन ०९ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव कॅम्पातील केबीएच विद्यालयात प्रतिमा पूजनप्रसंगी उपस्थित प्राचार्य अनिल पवार, उपप्राचार्य सुनील बागूल, रवींद्र शिरूडे, आर. डी. शेवाळे, राजेश धनवट आदि.

----

टीकेआरएच विद्यालय, निमगाव

मालेगाव : तालुक्यातील निमगाव येथील टी. के. आर. एच. विद्यालयात मुख्याध्यापक आर. जे. निकम यांनी प्रतिमा पूजन केले. अध्यक्षस्थानी एन. एम. मांडवडे होते. व्ही. व्ही. हिरे, पी. एन. गोटे यांची भाषणे झाली. विद्यार्थिनी गायत्री कांडेकर हिने सूत्रसंचालन केले. ऋतुजा हिरे हिने आभार मानले.

फोटो फाईल नेम : १२ एमजेएएन १८ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील निमगाव येथील टीकेआरएच विद्यालयात प्रतिमा पूजन प्रसंगी एन. एम. मांडवडे, व्ही. व्ही. हिरे, पी. एन. गोटे आदि.

----

व्हीबीएच विद्यालय, कळवाडी

मालेगाव : तालुक्यातील कळवाडी येथील व्ही. बी. एच. विद्यालयात अध्यक्षस्थानी श्रीमती एस. आर. आहेर होत्या. त्यांनी प्रतिमा पूजन केले. प्राचार्य के. व्ही. काकळीज, शिक्षक एस. पी. निकम यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन पी. डी. बागूल यांनी केले. आभार तुषार पारखे यांनी केले.

फोटो फाईल नेम : १२ एमजेएएन ११ . जेपीजी

फोटो कॅप्शन : कळवाडी येथील व्ही. बी. एच. विद्यालयात प्रतिमा पूजन प्रसंगी उपस्थित श्रीमती एस. आर. आहेर, एस. पी. निकम, प्राचार्य के. व्ही. काकळीज, पी. डी. बागूल आदि.

-----

मसगा महाविद्यालय

मालेगाव : कॅम्पातील मसगा महाविद्यालयात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. सी. एम. निकम होते. त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रा. उद्धव कुडासे यांचे भाषण झाले. कार्यक्रमास डॉ. के. एस. अहिरे, उपप्राचार्य दीपक सूर्यवंशी, अजिंक्य ठाकरे, जयवंत कट्यारे, डॉ. धर्मराज हलवर आदि उपस्थित होते.

फोटो फाईल नेम : १२ एमजेएएन १३ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मसगा महाविद्यालयात प्रतिमा पूजन प्रसंगी उपस्थित उपप्राचार्य डॉ. सी. एम. निकम, प्रा. उद्धव कुडासे, डॉ. के. एस. अहिरे, उपप्राचार्य दीपक सूर्यवंशी, अजिंक्य ठाकरे, जयवंत कट्यारे, डॉ. धर्मराज हलवर आदि.

-----

दौलती इंग्लिश स्कूल

मालेगाव : येथील दाैलती इंटरनॅशनल इंग्लिश मेडियम स्कूल येथे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष देविदास बच्छाव होते. त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. श्रीमती नम्रता निकम, निखील बोरसे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन विद्यार्थिनी ऋतुजा निकम, श्रद्धा शिरसाठ यांनी केले. आभार ऋतुजा पगार हिने मानले. कार्यक्रमास सचिन बच्छाव, पूनम बच्छाव, प्राचार्य गणेश शिंदे आदि उपस्थित होते.

फोटो फाईल नेम : १२ एमजेएएन १४ . जेपीजी

फोटो कॅप्शन : दौलती इंग्लिश स्कूलमध्ये प्रतिमा पूजन करताना देविदास बच्छाव. समवेत सचिन बच्छाव, नम्रता निकम आदि.

----

मालेगाव मनपा

मालेगाव : मालेगाव महानगरपालिकेत सभागृहात उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, कर संकलन अधिकारी राजू खैरनार यांनी प्रतिमा पूजन केले. कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त लोंढे, जयपाल त्रिभुवन, सचिन माळवाळ, सचिन महाले आदि उपस्थित होते.

फोटो फाईल नेम : १२ एमजेएएन १५ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव महानगरपालिकेत प्रतिमा पूजन प्रसंगी उपस्थित उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, राजू खैरनार, सचिन माळवाळ, जयपाल त्रिभुवन, सचिन महाले आदि.

Web Title: Greetings to Rajmata Jijau - Vivekananda in Malegaon city area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.