महापालिकेत बसवेश्वर जयंतीनिमित्त अभिवादन
By Admin | Updated: May 10, 2016 00:32 IST2016-05-10T00:02:11+5:302016-05-10T00:32:32+5:30
महापालिकेत बसवेश्वर जयंतीनिमित्त अभिवादन

महापालिकेत बसवेश्वर जयंतीनिमित्त अभिवादन
नाशिक : महापालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयात राजीव गांधी भवन येथे महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस महापौर अशोक मुर्तडक यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, उपमहापौर गुरुमित बग्गा, सभागृहनेत्या सुरेखा भोसले, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, गटनेते अजय बोरस्ते, उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, रोहिदास बहिरम, शहर अभियंता सुनील खुने, जनसंपर्क अधिकारी यशवंत ओगले, वीरशैव समाजाचे अनिल चौघुले, मधुबाला भोरे, गणेश भोरे, अनिल कोठुळे, साधना दिवटे, माया जंगम, मंदाकिनी जंगम, चंद्रशेखर दंदणे, सुधीर भुसारे, अरुण आवटे, मंगेश अंधोळकर आदि उपस्थित होते.