नटवर्य सतीश कानडे स्मृतीदिन एरंडगावी अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 16:57 IST2020-07-27T16:56:14+5:302020-07-27T16:57:02+5:30
लोकमत न्युजनेटवर्क एरंडगाव : साने गुरु जी शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वामी विवेकानंद विद्यालयात नटवर्य सतीश कानडे यांचा स्मृतीदिनी त्यांना ...

एरंडगाव (ता. येवला) येथील नटवर्य सतीश कानडे स्मृतीदिन प्रसंगी सालमुठे, गायकवाड, मेहेत्रे, बारहाते आदी.
ठळक मुद्दे कानडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
लोकमत न्युजनेटवर्क
एरंडगाव : साने गुरु जी शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वामी विवेकानंद विद्यालयात नटवर्य सतीश कानडे यांचा स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अंबादास सालमुठे होते. प्रारंभी प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी सुनिल गायकवाड, सालमुठे, पर्यवेक्षक सुनील मेहेत्रे आदींनी कानडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख लक्ष्मण बरहाते यांनी तर आभार संजय मढवई यांनी मानले. कार्यक्र मास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.