जनसेवाकडून शहिदांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:15 IST2021-03-25T04:15:02+5:302021-03-25T04:15:02+5:30

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील जनसेवा मित्रमंडळातर्फे शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना अभिवादन करण्यात ...

Greetings to the martyrs from Janseva | जनसेवाकडून शहिदांना अभिवादन

जनसेवाकडून शहिदांना अभिवादन

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील जनसेवा मित्रमंडळातर्फे शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शहिदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. आशीर्वाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक कचरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जनसेवा मित्रमंडळाचे अध्यक्ष रामदास भोर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या जीवनकार्याची माहिती भोर यांनी दिली. मातृभूमीच्या रक्षणार्थ जीवाची व घरादाराची पर्वा न करता, हे तिन्ही क्रांतिकारक हसतहसत फासावर गेले. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे, असे भोर यांनी सांगितले. यावेळी अर्जुन आव्हाड, शंकर आमले, संजय बिन्नर, ज्ञानेश्वर भोर, हिरामण आमले, राधाकिसन गुंड, राहिल मनियार, शरद तमनर, सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to the martyrs from Janseva