पाथरे येथे शहीद जवानांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 17:58 IST2019-05-03T17:58:15+5:302019-05-03T17:58:42+5:30

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात शाहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या नक्षलवादी हल्ल्याचा ग्रामस्थांनी निषेध केला.

Greetings to the martyred soldiers at Pathther | पाथरे येथे शहीद जवानांना अभिवादन

पाथरे येथे शहीद जवानांना अभिवादन

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात शाहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या नक्षलवादी हल्ल्याचा ग्रामस्थांनी निषेध केला.
१ मे महाराष्ट्रदिनी आपल्या भारतीय सीआरपीएफ जवानांवर गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जो भुसुरूंग लावुन स्फोट केला यात १५ जवान शहीद झाले. या हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी गावातील बाजारपेठेत वीर जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली आणि भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करून शोकसभा घेण्यात आली. यावेळी भारतीय सैनिक म्हणून कार्यरत असलेले परंतु सुट्टीवर आलेले योगेश दवंगे, दत्तात्रय दवंगे, बाळासाहेब कुमावत, संतोष बारहाते, संजय दवंगे यांनी श्रद्धांजली अर्पण करून मनोगत व्यक्त केले. शेवटी पसायदान घेऊन शोक सभेची सांगता झाली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Greetings to the martyred soldiers at Pathther