गाडगेबाबा महाराज यांना पिंपळगावी अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:45 IST2021-02-23T21:26:21+5:302021-02-24T00:45:50+5:30
पिंपळगाव बसवंत : पिंपळगांव ग्रामपंचायत भवनात राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

गाडगेबाबा महाराज यांना पिंपळगावी अभिवादन
ठळक मुद्देप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
पिंपळगाव बसवंत : पिंपळगांव ग्रामपंचायत भवनात राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
संत गाडगेबाबा हे आधुनिक संत होते. शिक्षण व आरोग्य आणि स्वच्छतेचे विचार देऊन निष्काम सेवा केली. संत गाडगेबाबा यांनी देशाला नवा विचार देऊन गावपातळीवर समाजजागृतीचे मोठे काम केले आहे, त्यांचे आचार विचार अमलात आणणे गरजेचे असल्याचे मत उपसरपंच सुहास मोरे यानी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी पिंपळगाव ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर, राहुल बनकर, बाळा बनकर, राजु भवर, संदीप तांबे आदींसह ग्रामपालिका कर्मचारी उपस्थित होते. (२३ पिंपळगाव गाडगेबाबा)