लाखलगाव शाळेत गाडगेबाबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 09:11 PM2021-02-24T21:11:52+5:302021-02-25T01:07:13+5:30

एकलहरेः लाखलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजेंद्र मालपुरे होते.

Greetings to Gadge Baba at Lakhalgaon School | लाखलगाव शाळेत गाडगेबाबांना अभिवादन

लाखलगाव शाळेत गाडगेबाबांना अभिवादन

Next

एकलहरेः लाखलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजेंद्र मालपुरे होते.

यावेळी मालपुरे यांच्यासह ज्येष्ठ शिक्षिका विजया पगार यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुणे लाखलगाव भजनी मंडळातील ज्येष्ठ नागरिक निवृत्ती जाधव यांनी आपल्या मनोगतात गाडगेबाबा लाखलगावात दोनदा आल्याचा उल्लेख केला. यावेळी विजया पगार, नीता कदम, सुचित्रा देवरे, विजय जगताप, शीतल पगार यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जगताप यांनी केले तर आभार शीतल पगार यांनी मानले. 
 

Web Title: Greetings to Gadge Baba at Lakhalgaon School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.