शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोककवी वामनदादा कर्डक यांना गझल संमेलनाद्वारे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 00:25 IST

येवला : लोककवी वामनदादा कर्डक यांचा १७ व्या स्मृती दिन लोकशाहिर दिना निमित्त लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, नाशिक आयोजित युट्युब ऑनलाईन निमंत्रितांचे कोरोना लोकजागृती काव्य, गीत, गझल संमेलनाद्वारे अनोखे अभिवादन करण्यात आले. संमेलनाध्यक्ष पार्श्वगायक नंदेश विठ्ठल उमप हे होते. उद‌्घाटन लोककवी हरेंद्र जाधव साहित्य संस्था नवी मुंबईच्या अध्यक्ष तारका जाधव यांनी केले.

ठळक मुद्दे१७ व्या स्मृती दिन लोकशाहिर दिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रम

येवला : लोककवी वामनदादा कर्डक यांचा १७ व्या स्मृती दिन लोकशाहिर दिना निमित्त लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, नाशिक आयोजित युट्युब ऑनलाईन निमंत्रितांचे कोरोना लोकजागृती काव्य, गीत, गझल संमेलनाद्वारे अनोखे अभिवादन करण्यात आले. संमेलनाध्यक्ष पार्श्वगायक नंदेश विठ्ठल उमप हे होते. उद‌्घाटन लोककवी हरेंद्र जाधव साहित्य संस्था नवी मुंबईच्या अध्यक्ष तारका जाधव यांनी केले.वामनदादा कर्डक यांनी सामाजिक प्रबोधन परिवर्तनाचा वसा घेऊन मानवी मूल्यांच्या व न्याय हक्काचा लढा आपल्या साहित्य प्रतिभेतून लोकांसमोर मांडला तोच संविधानिक कारवा लोकरंजनातून लोकप्रबोधन करीत तरुणांच्या ओठी आणि हाती मानवतेच गाणं रुजविण्याचा प्रयत्न प्रतिष्ठान करत असल्याचे मत यावेळी प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे संस्थापक कार्याध्यक्ष प्रा. शरद शेजवळ यांनी व्यक्त केले.संमेलनाध्यक्ष नंदेश उमप यांनी कविता सादर केली.अनिल कोशे (यवतमाळ), नुमान शेख (लासलगाव), सुनीता इंगळे (मूर्तिजापूर), प्रशांत धिवंदे, मकरंद जाधव, अशोक भालेराव (नाशिक), बबन सरवदे (मुंबई), मधुकर जाधव (सिन्नर), निलेश पवार (भुसावळ), रमेश बुरबुरे (गडचिरोली)भास्कर अमृतसागर (धुळे),सोनाली सोनटक्के (यवतमाळ) यांनी आपल्या गझल, कविता व गीते सादर केली. प्रा. राहुल सुर्यवंशी (मुंबई) यांनी तांत्रिक सह्यय तर सूत्रसंचालन मिलिंद गुंजाळ यांनी केले.नंदेश उमप यांच्या गाण्याने संमेलनाचा समारोप केला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक दिनेश वाघ,ॲड. अरुण दोंदे, वैभव कर्डक, वनिता सरोदे-पगारे, ॲड. शरद कोकाटे, अतुल डांगळे, दीपक शिंदे, सागर पगारे, कुलदीप दिवेकर, शैलेंद्र वाघ, सागर पगारे, सुरेश लोखंडे, प्रवीण कर्डक, सविता गजभिये,भारती बागुल, रामदास कुऱ्हाडे यांनी परिश्रम घेतले.

 

टॅग्स :yevla-acयेवलाSocialसामाजिक