छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
By Admin | Updated: May 15, 2014 00:09 IST2014-05-14T23:44:14+5:302014-05-15T00:09:08+5:30
३५७वी जयंती : सामाजिक संघटनांकडून प्रतिमापूजन

छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
३५७वी जयंती : सामाजिक संघटनांकडून प्रतिमापूजन
नाशिक : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३५७ व्या जयंतीनिमित्त शहरातील विविध सामाजिक संघटनांकडून महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. विविध कार्यक्रमांद्वारे संभाजी महाराजांच्या शौर्याचे दर्शन घडविण्यात आले. काही ठिकाणी साहसी मैदानी खेळ, तलवारबाजी, दांडपा, लाठीकाठी आदि खेळांचे प्रात्यक्षिक यावेळी शिवप्रेमींना दाखविण्यात आले. बालगोपाळ, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी या साहसी खेळांचा आनंद लुटला. यामुळे शिवमय वातावरण तयार झाले होते.
संभाजी ब्रिगेड
येथील संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुन्या नाशकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांचा वास्तव इतिहास व चरित्र जनमानसाला समजू लागले आहे. त्यांचा विद्वत्ता दर्शविणारा स्वभाव, स्त्रियांचा आदर करणारे गुण आजच्या युवा पिढीने आत्मसात करणे गरजेचे असल्याचे आवाहन यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष संतोष गायधनी, महानगरप्रमुख नितीन रोठेपाटील, विकी गायधनी, हिरामण वाघ, पुरुषोत्तम गोरडे, प्रफुल्ल वाघ, नीलेश कुसमोडे, बंटी दाते, वैभव दाते, श्रीकांत पगार, अमोल वडजे आदि उपस्थित होते.
छावा विद्यार्थी आघाडी
अखिल भारतीय छावा विद्यार्थी आघाडीच्या वतीने आडगाव येथे छत्रपती संभाजी राजेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रा. उमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शिवप्रेमी नागरिकांना लाडूचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक मीना माळोदे, जे. टी. शिंदे तसेच छावाचे मधू कासार, जगदीश जाधव, संजय सोमासे, नितीन सातपुते, आशिष हिरे, शरद श्िंादे, विजय उगले आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विलास माळोदे यांनी सूत्रसंचालन केले.
छावा मराठा कृती समिती
छावा मराठा कृती समितीच्या वतीने जुन्या नाशकातील डिंगरआळीत छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद बोरसे, जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पारखे, राष्ट्रवादीचे पंचवटी अध्यक्ष देवांग जानी, स्वप्नील पगार, हर्षद पवार, तेजस पवार, तुषार हिरे, विवेक पाटील, दीपक फलटने, बाळासाहेब सूर्यवंशी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.