पिंपळगावी अण्णाभाऊ साठेंना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 15:07 IST2020-08-04T15:03:06+5:302020-08-04T15:07:58+5:30
पिंपळगाव बसवंत : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरातील भाऊ नगरसह अग्निशमन विभागाच्या कार्यालयात उत्साहात साजरी झाली. मान्यवरांच्या उपस्थित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.

पिंपळगावी अण्णाभाऊ साठेंना अभिवादन
पिंपळगाव बसवंत : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरातील भाऊ नगरसह अग्निशमन विभागाच्या कार्यालयात उत्साहात साजरी झाली. मान्यवरांच्या उपस्थित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
सकल मातंग समाज बांधवांच्या वतीने तर अग्निशमन विभागात ग्रामपालिका व बहुजन रयत परिषदेच्या वतीने कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ग्रामपालिकेचे माजी सरपंच भास्कर बनकर, सतीश मोरे, विश्वास मोरे, गणेश बनकर, निलेश पाटील, राजेश पाटील, संजय मोरे, किरण लभडे, महेंद्र साळवे, संजय शिरसाठ, नाना जाधव, श्याम निभरवणे, मंगेश शिरसाठ, संतोष साळवे भारत भालेराव आदी उपस्थित होते.