...तर पत्रकारितेतून उत्तम साहित्यनिर्मिती गिरीश कुबेर : कुसुमाग्रज स्मरण कार्यक्रमात प्रकट मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:19 AM2018-03-09T00:19:09+5:302018-03-09T00:19:09+5:30

नाशिक : पत्रकारिता आणि लेखनसाहित्य याचा परस्पर संबंध आहे, हे नाकारून चालणार नाही किंवा याविषयी कोणाच्या मनात शंकाही येऊ नये.

Greet Kuber: A good interview from Kusumagrajas remembrance program | ...तर पत्रकारितेतून उत्तम साहित्यनिर्मिती गिरीश कुबेर : कुसुमाग्रज स्मरण कार्यक्रमात प्रकट मुलाखत

...तर पत्रकारितेतून उत्तम साहित्यनिर्मिती गिरीश कुबेर : कुसुमाग्रज स्मरण कार्यक्रमात प्रकट मुलाखत

googlenewsNext
ठळक मुद्दे‘साहित्य-कला-संस्कृती आणि पत्रकारिता’ विषय डोळ्यासमोर ठेवून मुलाखतसाहित्य, कला आणि संस्कृतीची पत्रकारितेशी जुळलेली नाळ

नाशिक : पत्रकारिता आणि लेखनसाहित्य याचा परस्पर संबंध आहे, हे नाकारून चालणार नाही किंवा याविषयी कोणाच्या मनात शंकाही येऊ नये. त्या-त्या काळातील साहित्य हे पत्रकारितेतून पुढे आले आहे व तशा नोंदी इतिहासात आहेत. बातमीच्या पलीकडे जाऊन काही तरी वेगळं शोधण्याची इच्छाशक्ती व दृष्टिकोन पत्रकारांनी बाळगला तर उत्तम साहित्यनिर्मिती होणे शक्य आहे, असे मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुलाखतीतून मांडले. कुसुमाग्रज स्मरण कार्यक्रमांतर्गत गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकामधील विशाखा सभागृहात ‘साहित्य-कला-संस्कृती आणि पत्रकारिता’ हा विषय डोळ्यासमोर ठेवून लोकेश शेवडे यांनी कुबेर यांची गुरुवारी (दि.८) मुलाखत घेतली. यावेळी त्यांच्या विविध प्रश्नांची कुबेर यांनी दिलखुलासपणे उत्तरे देत साहित्य, कला आणि संस्कृतीची पत्रकारितेशी जुळलेली नाळ आणि पत्रकारांनी सभोवतालच्या घडलेल्या घटनांचे साक्षीदार म्हणून केलेले घटनापलीकडील साहित्यलेखनावर प्रकाश टाकला. यावेळी कुबेर म्हणाले, जे सभोवताली आपल्या डोळ्यांना दिसत असतं त्यापलीकडेही खूप काही घडत असतं; मात्र आज दुर्दैवाने पत्रकारांची विचारसरणी बातमी व अंक एवढी मर्यादित स्वरूपाची झाली आहे. बातमीच्या पलीकडे जाऊन विचार केल्यास मोठा ऐवज हाती लागू शकतो हा विश्वास पत्रकारांनी बाळगल्यास साहित्यनिर्मिती होऊ शकते, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Greet Kuber: A good interview from Kusumagrajas remembrance program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.