दिंडोरीत वृक्षलागवडीने पसरली हिरवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:39 IST2021-02-23T20:32:16+5:302021-02-24T00:39:41+5:30
लखमापूर : शासनाच्या ह्यझाडे लावा आणि झाडे जगवाह्ण ही संकल्पना राबवत असताना फक्त कागदी घोडे मिरवण्यात धन्यता मानत दरवर्षी त्याच खड्ड्यात झाडे लावताना आपण बघतो; परंतु योग्य नियोजन करून झाडे लावणेच नाही तर त्याचे संगोपन करून दाखवत गावात सर्वत्र हिरवळ करून दाखवणारे दिंडोरी तालुक्यात आदर्श संकल्पना राबवणारे गाव म्हणजे जऊळके-दिंडोरी होय.

दिंडोरीत वृक्षलागवडीने पसरली हिरवळ
लखमापूर : शासनाच्या ह्यझाडे लावा आणि झाडे जगवाह्ण ही संकल्पना राबवत असताना फक्त कागदी घोडे मिरवण्यात धन्यता मानत दरवर्षी त्याच खड्ड्यात झाडे लावताना आपण बघतो; परंतु योग्य नियोजन करून झाडे लावणेच नाही तर त्याचे संगोपन करून दाखवत गावात सर्वत्र हिरवळ करून दाखवणारे दिंडोरी तालुक्यात आदर्श संकल्पना राबवणारे गाव म्हणजे जऊळके-दिंडोरी होय.
जऊळके-दिंडोरी येथील तुकाराम जोंधळे यांच्या संकल्पनेतून गावातील रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली आहेत. त्या झाडांना व्यवस्थित संरक्षक जाळी लावत ड्रिपद्वारे पाणी देण्याची व्यवस्था केली. साधारण सहा किलोमीटर अंतराचे ड्रिप करून झाडांचे संवर्धन करण्यात जऊळके-दिंडोरी गावाला यश आले आहे.
जवळपास ३ हजार झाडे लावून त्यांची योग्य नीगा राखत संगोपन केल्यामुळे गावात दुतर्फा सर्वत्र हिरवळ दिसून येत आहे. यात देशीआंबा ५०० , जांभुळ ४००, फणस ५०, बहावा १००, पिंपळ ५०, वड ५०, मोहगणी ५०, फलकस १५०, उंबर २५, मोह ५०, कंदक ५० , अशोक १००, कांचन १५०, कंबोडिया ५०, नारळ १०, शिक्षण १००, टिकोमा २००, चेरी २०, बदाम २०, बांबू ५०, बोगनपेल १००, टबोबिया मेल्को ३००, कडुनिंब १०० आदी झाडे लावत त्यांचे योग्य संगोपन केल्यामुळे सर्वत्र हिरवळ पसरली आहे.
ग्रामस्थांनीदेखील वृक्षप्रेम दर्शवत योग्य ते सहकार्य करून यात आपलेही योगदान दिले आहे. शासनाच्या झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेला साथ देत जऊळके-दिंडोरी गावाने जिल्ह्यात एक आदर्श उपक्रम राबवत वृक्षाबद्दल प्रेम असेल आणि त्याचे योग्य काळजी घेतली तर वृक्षांचे कसे संगोपन करता येईल याचे योग्य ते उदाहरण दाखवून दिले आहे. ही संकल्पना पाहण्यासाठी परिसरातील गावकरी भेट देऊन माहिती जाणून घेत आहेत.
झाड लावल्यानंतर त्याचे संगोपन करणे ही खरी जबाबदारी आहे. वृक्ष लागवड ही संकल्पना मनात होतीच; परंतु लोकांना सांगण्यापेक्षा ती आपल्यापासून सुरुवात करावी या विचारातून आम्ही पाच-सहा वर्षांपासून झाडे लावली असून त्याचे योग्य संगोपन केल्याने आज ती झाडे मोठी झाली आहेत. गावचे एक आकर्षण वाढले आहे. यात वेगळेच समाधान लाभत आहे. इतर गावांनीही याप्रकारे वृक्ष लागवड करून संगोपन करावे.
- भारती जोंधळे, सरपंच, जऊळके-दिंडोरी.