शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

‘केटीवेअर’साठी हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:09 IST

शहराला पाणीपुरवठा करणाºया ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रालगत गणपती मंदिराजवळील नियोजित असलेल्या के.टी.वेअर बंधाºयाच्या जागेसह जॅकवेल विहिरीची जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी पाहणी केली. या केटीवेअर बंधाºयाच्या कामासाठी जिल्हाधिकाºयांनी हिरवा कंदील दिल्याने सटाणा, देवळा शहरासह चौदा गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

सटाणा : शहराला पाणीपुरवठा करणाºया ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रालगत गणपती मंदिराजवळील नियोजित असलेल्या के.टी.वेअर बंधाºयाच्या जागेसह जॅकवेल विहिरीची जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी पाहणी केली. या केटीवेअर बंधाºयाच्या कामासाठी जिल्हाधिकाºयांनी हिरवा कंदील दिल्याने सटाणा, देवळा शहरासह चौदा गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन प्रथमच बागलाण तालुका दौºयावर आले असता प्रांताधिकारी प्रवीण महाजन, तहसीलदार सुनील सैंदाणे, देवळ्याचे तहसीलदार कैलास पवार, पालिका गटनेते संदीप सोनवणे आणि नगरपालिका अधिकाºयांसमवेत संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. मालेगावला पाणीपुरवठा करणाºया तळवाडे तलावाची साठवण क्षमता वाढविण्यात आली आहे. त्यामुळे मालेगाव महानगरपालिकेच्या आवर्तनातील अंतर वाढले आहे. त्यामुळे यादरम्यानच्या काळातच शहराला अकस्मात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या नियोजित बंधाºयामुळे ती तूट भरून निघण्यास मदत होणार असल्याने शहरासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या या मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी गळ यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना घातली. यावेळी सटाणा व देवळा शहराला पाणीपुरवठा करणाºया गिरणा पात्रात गणपती मंदिराजवळ कोल्हापूर टाइप बंधारा बांधल्यास दोन्ही शहरांसोबत परिसरातील चौदा गावांची पाणीसमस्या सोडविता येईल, असे आमदार डॉ. राहुल अहेर व नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाºयांनी हा दौरा केला. यावेळी नगरसेवकांसह दत्तू बैताडे, श्याम बगडाणे, संजय सोनवणे व कर्मचारी उपस्थित होते.