क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याप्रति कृतज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 09:20 PM2021-01-04T21:20:12+5:302021-01-05T00:11:10+5:30

नाशिक : जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक संस्थांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Gratitude to Krantijyoti Savitribai Phule | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याप्रति कृतज्ञता

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याप्रति कृतज्ञता

Next
ठळक मुद्देअभिवादन : जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्थांतर्फे विविध उपक्रम

राष्ट्र सेवा दल, मालेगाव
मालेगाव : येथील राष्ट्र सेवा दलाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विलास वडगे अध्यक्षस्थानी होते. यावेळी महापौर ताहेरा शेख, नगरसेविका ॲड. ज्योती भोसले, तंत्रस्नेही शिक्षक वैशाली भामरे, तालुका कार्याध्यक्ष सुधीर साळुंके मंचावर उपस्थित होते. कोविड-१९ काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आशा वर्कर्स तसेच आरोग्य सेविकांचा सत्कार करण्यात आला.प्रास्तविक राज्य सचिव नचिकेत कोळपकर यांनी केले. नगरसेविका ज्योती भोसले, वैशाली भामरे यांची भाषणे झाली. उत्सव समिती अध्यक्ष राजीव वडगे यांनी आभार मानले.
एससी एसटी रेल्वे असोसिएशन, मनमाड
मनमाड : येथील रेल्वे कारखान्यातील ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाइज असोसिएशनच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रदीप गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश केदारे, फुले शाहू आंबेडकर मुस्लीम मंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख, अध्यक्ष बेग आदी उपस्थित होते. याप्रसंगी विजय गेडाम, सुरेश अहिरे, नवनाथ जगताप, प्रेमदीप खडताळे, सुनील सोनवणे, विजय गायकवाड, अर्जुन बागुल, विनोद खरे, सागर गरुड यांनी केले. सूत्रसंचलन रत्नदीप पगारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रवीण अहिरे उपस्थित होते.
कला, वाणिज्य महाविद्यालय, दिंडोरी
दिंडोरी : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात डॉ.संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.प्रल्हाद दुधाणे यांनी जीवन व कार्याविषयी माहिती दिली. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.नाना चव्हाण यांनी तर आभार प्रा.सीताराम भोये यांनी मानले.

Web Title: Gratitude to Krantijyoti Savitribai Phule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.