रस्त्याच्या कडेला गवताचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:48+5:302021-07-22T04:10:48+5:30
--------------------- श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी नांदूरशिंगोटे : गावातील अनेक भागात भटक्या श्वानांची संख्या वाढली असून, ते टोळक्याने बसत असल्याने ...

रस्त्याच्या कडेला गवताचा वेढा
---------------------
श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी
नांदूरशिंगोटे : गावातील अनेक भागात भटक्या श्वानांची संख्या वाढली असून, ते टोळक्याने बसत असल्याने रात्रीच्या वेळेस हल्ला चढवत आहेत. बसस्थानक परिसर, चास नाका, निमोण नाका आदी भागात श्वानांचा मोठ्या प्रमाणात संचार आहे.
----------------------
आषाढातही होऊ लागले विवाह
नांदूरशिंगोटे : पूर्वी आषाढ महिन्यात लग्न लावले जात नसायचे; परंतु कालपरत्वे आता आषाढातही लग्नाचा मुहूर्त साधला जात आहे. या महिन्यात बहुधा अन्य कामावर लक्ष दिले जात होते. गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीमुळे कार्यक्रमांवर मर्यादा आल्याने आषाढातही विवाह सोहळे उरकण्यावर भर आहे.
---------------------
पीकविम्यासाठी मिळाली मुदतवाढ
नांदूरशिंगोटे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २०२१-२२च्या खरीप हंगामासाठी पीकविमा प्रस्ताव स्वीकारणे सुरू असून, पीकविमा भरण्याची अंतिम मुदत शुक्रवार, २३ जुलैपर्यंत वाढविली असून, पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.