द्राक्ष निर्यातदाराना नविन कोरोना व्हायरसची भिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 16:11 IST2020-12-26T16:10:59+5:302020-12-26T16:11:20+5:30
खेडगाव : दिंडोरी तालुक्यात निर्यातक्षम आर्ली द्राक्ष हंगाम पंधरा दिवसात चालू होण्याची शक्यता असताना ब्रिटन मध्ये आढळून आलेल्या नविन कोरोना विषाणूमुळे बाहेरील देशात पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यास पुन्हा द्राक्ष निर्यातीला फटका बसणार कि काय यांमुळे तालुक्यातील द्राक्ष उत्पादकामध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांमुळे द्राक्ष निर्यात करणा-यां युनिटने आपली भूमिका स्पष्ट करून शेतकऱ्यांना मागदर्शन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

मागील वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात लॉकडाऊन नसल्यामुळे या दोन महिन्यात निर्यातीला फटका बसलेला नव्हता मात्र १५ मार्चनंतर जगात सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग झापाटल्याने वाढल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यातीला फटका बसला होता चालू हंगाम ब्रिटनमध्ये कोरोनाचा नविन विषाणू आढळून आल्यांमुळे द्राक्ष निर्यातदार धास्तावले आहे. त्यांत मागील वर्षी पावसामुळे निर्यातक्षम द्राक्षची गुणवत्ता कमी झाल्यांमुळे चालू वर्षी बाहेर देशाची निर्यातक्षम द्राक्षाची मागणी १५ ते २० टक्क्यांनी कमी झाल्यांचे बोलले जात आहे त्यांमुळे आरली हंगामातील द्राक्षच्या गुणवत्तेवर पुढील मागणी अवलंबून असल्यामुळे आता होणा-यां द्राक्ष निर्यातीमध्ये गुणवत्तेला मोठ्या प्रमाणात महत्व देणार असल्यांचे बोलले जाते त्याप्रमाणे द्राक्ष निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या असून त्यामध्ये कंटेनर व जहाजांच्या भाड्यामध्ये वाढ झाल्यामुळे यांचा परिणाम द्राक्ष निर्यातीवर होणार की काय हा प्रश्न अनुत्तरित आहे .
या नविन कोरोना विषाणूमुळे बाहेर देशात लॉकडाऊन झाल्यास देशांतर्गत निर्यातक्षम द्राक्षला कुठेही बाजार पेठ उपलब्ध झालेली नाही त्यामुळे द्राक्षनिर्यातदार युनिटने आशी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी उपायोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे तसेच केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने द्राक्ष निर्यातीला कोणत्याही प्रकारे फटका बसणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे .नाही तर मगील वर्षी द्राक्ष हंगामाला जो फटका तो फटका पुन्हा द्राक्ष उत्पादकांना बसल्यास द्राक्षशेती धोक्यात येणार असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे .