नाशिकमध्ये होणार द्राक्ष क्लस्टरचा पथदर्शी प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 01:09 IST2021-06-17T01:07:36+5:302021-06-17T01:09:35+5:30
केंद्र शासनाने देशात ५३ द्राक्ष क्लस्टर उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यातील पथदर्शी प्रकल्पात नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या क्लस्टर योजनेचे बुधवारी नाशिक येथील कृषी विभागाच्या प्रशिक्षण केंद्र सभागृहात सादरीकरण करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, कृषी विभागाचे संजय पडवळ, अशोक गायकवाडे, जगन्नाथ खापरे, माणिकराव पाटील, संजय पाटील, सुनिल वानखेडे, डॉ. राजपूत, डॉ. बडगुजर, नॅशनल व्हर्टिकल बोर्डचे हुशारसिंग, प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, हेमंत काळे आदी उपस्थित होते.

नाशिकमध्ये होणार द्राक्ष क्लस्टरचा पथदर्शी प्रकल्प
नाशिक : केंद्र शासनाने देशात ५३ द्राक्ष क्लस्टर उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यातील पथदर्शी प्रकल्पात नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या क्लस्टर योजनेचे बुधवारी नाशिक येथील कृषी विभागाच्या प्रशिक्षण केंद्र सभागृहात सादरीकरण करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, कृषी विभागाचे संजय पडवळ, अशोक गायकवाडे, जगन्नाथ खापरे, माणिकराव पाटील, संजय पाटील, सुनिल वानखेडे, डॉ. राजपूत, डॉ. बडगुजर, नॅशनल व्हर्टिकल बोर्डचे हुशारसिंग, प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, हेमंत काळे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात ग्रॅड थॉटर या कंपनीचे व्यवस्थापक झानीयल यांनी ऑनलाईन द्राक्ष क्लस्टरचे सादरीकरण केले. यावेळी झानीयाल यांनी द्राक्षांचे देशात आणि देशाबाहेर असलेले महत्त्व तसेच द्राक्ष उत्पादनात येणाऱ्या अडीअडचणींवर मात करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याची सविस्तर माहिती दिली. देशभरात द्राक्ष उत्पादनात नाशिकचा क्रमांक पहिला असून या व्यवसायावर जिल्ह्यातील हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. द्राक्ष क्लस्टरमुळे शेतकऱ्यांना एकत्रित येऊन आपल्या मालाचा दर्जा सुधारण्यास मदत होणार असून द्राक्ष उत्पादन ते मार्केटपर्यंतच्या सर्व समस्या सहज सोडविता येणार आहेत. असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी खासदार हेमंत गोडसे म्हणाले, केंद्र शासनाच्या नॅशनल हॉर्टीकल्चर बोर्डने उपलब्ध करून दिलेली द्राक्ष क्लस्टर योजना नाशिक जिल्ह्यासाठी वरदान ठरणारी आहे. शेतकऱ्यांना एकत्रित येऊन आपल्या मालाचा दर्जा सुधारता येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी द्राक्ष क्लस्टर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार गोडसे यांनी केले आहे.
यावेळी तान्हाजी गायकर, अनिल ढिकले, दत्तू ढगे, मनोज जाधव, आर. के. शिरसाठ, हेमंत काळे, गोकुळ वाघ, एस. पी. सूर्यवंशी, पी. के. खैरनार, डी. पी. गंभीरे, मंगेश भास्कर, पंकज नाठे, अरुण मोरे, नितीन पाटील, भूषण निकम, प्रदीप भुसारे आदींसह द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
चौकट-
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी मांडल्या सूचना
अत्याधुनिक रोपांची निर्मिती करण्यात यावी. रोपे देण्याआधी कंपनीने शेतातील पाणी आणि जमिनीचा पोत (दर्जा) तपासणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त आणि अत्याधुनिक नर्सरी केंद्र उभारावेत, द्राक्ष पिकावर दावणी रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही, अशा रोपांच्या जातींची निर्मिती करावी. अवकाळी पावसापासून आणि विविध रोगांच्या प्रादुर्भावापासून द्राक्ष बागांचे संरक्षण होण्यासाठी विविध उपाययोजनांचा क्लस्टरमध्ये समावेश असावा. नर्सरीच्या सहा व्हरायटी असाव्यात. क्लस्टरमध्ये प्लास्टिक सीटच्या उत्तम दर्जाचा समावेश असावा. बागांच्या डाटा कलेक्शनसाठी जी.पी.एस. द्वारे आढावा घ्यावा. जिल्हास्तरावर कोल्ड स्टोरेजची व्यवस्था असावी, औषध फवारणीमुळे
द्राक्ष खाण्यास घातक असतात हा अपप्रचार थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, फार्मर प्रोटेक्टर ॲक्टमध्ये बदल करावा, अशा सूचना यावेळी द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि अभ्यासकांनी मांडल्या.