खानगांव नजिक येथील खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षेमणी लिलाव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2021 05:22 PM2021-01-31T17:22:02+5:302021-01-31T17:23:02+5:30

लासलगाव : खानगांव नजिक व परीसरातील द्राक्षे उत्पादक शेतकरी बांधवांच्या सोईसाठी याही वर्षी लासलगांव बाजार समितीच्या खानगांव नजिक येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर सोमवारपासून (दि.१) द्राक्षेमणी शेतीमाल लिलाव सुरू होणार असल्याची माहिती लासलगांव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप व उपसभापती प्रिती बोरगुडे यांनी दिली.

Grape auction begins at shopping center near Khangaon | खानगांव नजिक येथील खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षेमणी लिलाव सुरू

खानगांव नजिक येथील खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षेमणी लिलाव सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देबाजार समितीच्या कार्यक्षेत्रात विनापरवाना खरेदी करणा-या द्राक्षेमणी खरेदीदारांवर कारवाई

लासलगाव : खानगांव नजिक व परीसरातील द्राक्षे उत्पादक शेतकरी बांधवांच्या सोईसाठी याही वर्षी लासलगांव बाजार समितीच्या खानगांव नजिक येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर सोमवारपासून (दि.१) द्राक्षेमणी शेतीमाल लिलाव सुरू होणार असल्याची माहिती लासलगांव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप व उपसभापती प्रिती बोरगुडे यांनी दिली.

खानगांव नजिक सह परीसरातील वनसगांव, ब्राम्हणगांव (व.), खडक माळेगांव, सारोळे खुर्द, रानवड, कोटमगांव आदि गावांमध्ये शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची लागवड केलेली असल्याने त्यांच्या मालविक्रीची सोय व्हावी म्हणुन लासलगांव बाजार समितीतर्फे खानगांव नजिक येथे केंद्रास शेतकरी व व्यापारी बांधवांकडुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याने यावर्षी देखिल खानगांव नजिक येथील खरेदी-विक्री केंद्रावर सोमवारपासुन द्राक्षेमणी या शेतीमालाचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परीसरातील शेतकरी बांधवांनी खानगांव नजिक येथील खरेदी-विक्री केंद्रावर आपला द्राक्षेमणी हा शेतीमाल योग्य प्रतवारी करून विक्रीसाठी आणल्यास वजनमापानंतर लगेच रोख पेमेंट देण्याची व्यवस्था बाजार समितीने केलेली आहे.

बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात विनापरवाना शिवार खरेदी करणा-या द्राक्षेमणी खरेदीदारांवर कायद्यातील तरतुदीप्रमाणे कठोर कारवाई करण्याचे आदेश बाजार समिती प्रशासनाला देण्यात आले आहे. बाजार समितीच्या खानगांव नजिक येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षेमणी शेतीमाल खरेदीस इच्छुक असलेल्या व्यापा-यांनी लायसेन्सबाबतच्या सर्व अटी पुर्ण केल्यास संबंधित व्यापा-यांना तात्काळ लायसेन्स देऊन खरेदी-विक्री केंद्रावर पॅकींग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी बाजार समितीच्या लासलगांव मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले. सोमवारी दुपारी ४ वाजता होणा-या द्राक्षेमणी लिलाव शुभारंभास बाजार समितीच्या पदाधिका-यांसह परीसरातील सोसायटी आणि ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, शेतकरी, अडते, खरेदीदार, मदतनीस यांनी उपस्थित रहावे असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Grape auction begins at shopping center near Khangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.