ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुवर्ण महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 21:15 IST2019-09-01T21:14:57+5:302019-09-01T21:15:25+5:30

जायखेडा : खान्देशातील हजारो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान वै. कृष्णाजी माऊली जायखेडकर यांनी सुरु केलेला व पन्नास वर्षांची अखंड परंपरा असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Grantharaj Dnyaneshwari Parayana Golden Festival | ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुवर्ण महोत्सव

ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुवर्ण महोत्सव

ठळक मुद्दे पारायण सोहळ्यास महाराष्ट्रातील शेकडो वारकरी भाविक सहभागी झाले होते.

जायखेडा : खान्देशातील हजारो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान वै. कृष्णाजी माऊली जायखेडकर यांनी सुरु केलेला व पन्नास वर्षांची अखंड परंपरा असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
जायखेडा येथील पुरातन पंचमुखी महादेव मंदिराजवळील सभागृहात या निमित्ताने भजन, कीर्तन, हरिपाठ, प्रवचनासह विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्र माचा शुभारंभ कृष्णाजी माऊलींच्या कन्या यशोदा आक्का जायखेडकर यांच्या हस्ते ग्रंथराज ज्ञानेश्वरी पुजनाने करण्यात आला.
सात दिवस चालणाºया या पारायण सोहळ्यास महाराष्ट्रातील शेकडो वारकरी भाविक सहभागी झाले होते. पारायण सोहळ्यासाठी आलेल्या वारकरी भाविकांच्या फराळाची व भोजनाची व्यवस्था स्थानिक नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने करण्यात आली. सोहळ्यात विष्णू महाराज गोंडे पंढरपूरकर, तुकाराम महाराज जेऊरकर, जगन्नाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज कदम आळंदीकर, प्रमोद महाराज जगताप, अनिल महाराज बार्शीकर, प्रकाश महाराज जाधव यांच्या कीर्तनाचे कार्यक्र म संपन्न झाले. या सोहळ्याची सांगता काल्याचे कार्यक्र म तसेच महाप्रसादाने करण्यात आली.
महाप्रसादाची सेवा आनंद खैरनार, किरण गायकवाड, तकदिर सोनवणे, दादाजी बच्छाव, पिंटू खैरनार यांच्या तर्फे देण्यार आली. यावेळी वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: Grantharaj Dnyaneshwari Parayana Golden Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक