गरजू विद्यार्थ्यांना धान्याचे वाटप
By Admin | Updated: May 15, 2014 23:55 IST2014-05-15T23:45:50+5:302014-05-15T23:55:30+5:30
नाशिक : विठ्ठल-रुक्मिणी हास्ययोग क्लबच्या वतीने हुतात्मा स्मारकात आदिवासी विभागातून अभ्यासासाठी येणार्या व तेथेच निवास करणार्या गरजू विद्यार्थ्यांना गव्हाच्या पीठाचे वितरण करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणी क्लबच्या प्रत्येक सदस्याने एक-एक किलो धान्य जमा करत ३५ किलो गव्हाचे पीठ सदर विद्यार्थ्यांना दिले. यावेळी महाराष्ट्र हास्ययोग संघाच्या अध्यक्ष डॉ. सौ. सुषमा दुगड, नाशिक जिल्हा हास्ययोग समन्वय समितीचे सदस्य ॲड. आर. डी. बाफणा, विठ्ठल-रुक्मिणी हास्ययोग क्लबच्या अध्यक्ष सौ. सविता एरंडे आदि उपस्थित होते. हुतात्मा स्मारकाचे सचिव वसंतराव हुदलीकर यांनी क्लबच्या सदस्यांचे आभार मानले.