दादा, आपने हमारा नमक खाया है !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST2021-07-24T04:11:10+5:302021-07-24T04:11:10+5:30
- संजय पाठक ....... कन्नूला पकडा भो.... नाशिक महापालिकेत भाजपच्या गद्दारीचे एकूण अपश्रेय कन्नू ताजणे यांना माजी आमदारांनी दिले ...

दादा, आपने हमारा नमक खाया है !
- संजय पाठक
.......
कन्नूला पकडा भो....
नाशिक महापालिकेत भाजपच्या गद्दारीचे एकूण अपश्रेय कन्नू ताजणे यांना माजी आमदारांनी दिले आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या गटाच्या मानल्या जाणाऱ्या डॉ. सीमा ताजणे मतदानात सहभागी झाल्या नाही कारण, त्या सध्या कोणाचे फोन उचलत नाही, का उचलत नाही तर म्हणे बिटको रुग्णालयात तोडफोड केल्यानंतर त्यांचे पती कन्नू ताजणे फरार आहे. कन्नूला पोलिसांनी वेळेत पकडले असते तर सीमा ताजणे यांनी फेान घेतला असता आणि त्या मतदानाला आल्या असत्या, पक्षाची लाजही वाचली असती, असा निष्कर्ष भाजपच्या एका बैठकीत निघाला आहे. म्हणजे कन्नू ताजणे हे पक्षाच्या पराभूत असल्याचा अजब निष्कर्ष संबंधित नेते सांगत आहेत. त्यामुळे पक्षाची चाड असलेले त्रस्त नेते कन्नूला लवकर पकडा भो....अशी उपरोधिक मागणीही करू लागली आहेत.