ग्रामपंचायत निवडणुकीत नियुक्तीस ग्रामसेवक संघटनेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 10:46 PM2020-12-23T22:46:38+5:302020-12-24T00:51:02+5:30

नांदगांव : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नामांकन दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नाही. दरम्यान तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकवीस ग्रामसेवकांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती आदेश देण्यात आले. त्याला ग्रामसेवकांच्या संघटनेने विरोध केला आहे.

Gramsevak Sanghatana opposes appointment in Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीत नियुक्तीस ग्रामसेवक संघटनेचा विरोध

ग्रामपंचायत निवडणुकीत नियुक्तीस ग्रामसेवक संघटनेचा विरोध

Next
ठळक मुद्देनिवेदन : दुहेरी जबाबदारी सांभाळणे अवघड

नांदगांव : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नामांकन दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नाही. दरम्यान तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकवीस ग्रामसेवकांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती आदेश देण्यात आले. त्याला ग्रामसेवकांच्या संघटनेने विरोध केला आहे.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरिता सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परंतु निवडणूक ग्रामपंचायत पातळीवरील असल्याने ग्रामसेवकास निवडणुकीकरिता इच्छुक उमेदवारास दाखले देणे, उतारे देणे, तसेच घरपट्टी, पाणीपट्टी, व इतर करांच्या पावत्या देणे करिता ग्रामपंचायतीत थांबणे गरजेचे असते. त्यामुळे सहाय्यक निवडणूक अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळतांना ग्रामपंचायतीची जबाबदारी सांभाळणे कठीण होणार आहे. याकडे लक्ष वेधत ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार उदय कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

बँकांना सूचना
इच्छुक उमेदवारास बँकेत स्वतंत्र खाते उघडण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र बँकेत अगोदरच खाते असल्यामुळे दुसरे खाते उघडण्यास बँकांनी नकार दिल्याचा प्रकार घडल्याने अनेकांना पहिल्या दिवशी अर्ज भरता आला नाही. इच्छुक उमेदवारांचे खाते खोलण्या विषयी दि. १८ डिसेंबर रोजी बँकांना पत्र दिले आहे. तरीही बँकांची बैठक घेऊन तशा सुचना दिल्या आहेत. उद्यापासून अडचणी येणार नाहीत, असे तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: Gramsevak Sanghatana opposes appointment in Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.