कचुरपाडा येथे ग्रामस्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 17:28 IST2020-08-29T17:27:50+5:302020-08-29T17:28:30+5:30

अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील कचुरपाडा येथे कोरोना व पावसाळ्याच्या पाशर््वभूमीवर जनसेवा मंडळ, पेठ व सुरगाणा पंचायतीच्या वतीने ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.

Gram Swachhta Abhiyan at Kachurpada | कचुरपाडा येथे ग्रामस्वच्छता अभियान

कचुरपाडा येथे ग्रामस्वच्छता अभियान

ठळक मुद्देअस्वच्छतेने रोगराईला आमंत्रण

अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील कचुरपाडा येथे कोरोना व पावसाळ्याच्या पाशर््वभूमीवर जनसेवा मंडळ, पेठ व सुरगाणा पंचायतीच्या वतीने ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. पावसाळ्याच्या पाशर््वभूमीवर जनआरोग्याच्य दृष्टीने ग्रामस्वच्छता राखणे अधिक महत्त्वाचे असून अस्वच्छतेने रोगराईला आमंत्रण मिळते. याबरोबर पावसाळ्यात गावपाड्यात व परिसरात मोठया प्रमाणावर गवत वाढलेले असल्याने सुरगाणा तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागात सर्पदंशसारख्या घटना घडल्या आहेत. यागोष्टिंना आळा बसावा व सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व समजावे म्हणून या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मनोहर जाधव, दिलीप महाले, कमलेश वाघमारे, हनुमंत वाघमारे, हंसराज भोये, पंडित गवे, धनाजी लहरे, कृष्णा वाघमारे, पंढरीनाथ भडांगे, कमलाकर गवे, कैलास चौधरी आदी उपस्थित होते.
 

Web Title: Gram Swachhta Abhiyan at Kachurpada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.