रविवारी पुन्हा ग्रामसभा

By Admin | Updated: October 13, 2016 23:45 IST2016-10-13T23:40:54+5:302016-10-13T23:45:51+5:30

रविवारी पुन्हा ग्रामसभा

Gram Sabha again on Sunday | रविवारी पुन्हा ग्रामसभा

रविवारी पुन्हा ग्रामसभा

नाशिक : १ व २ आॅक्टोबर रोजी गावोगावी ग्रामसभा घेऊन त्यात पदवीधर मतदार नोंदणीबाबत जागृती करण्यात अपयशी ठरलेल्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याबरोबरच येत्या रविवारी (दि. १६) पुन्हा ग्रामसभा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
सध्या विधानसभा मतदार याद्यांचे पुनर्रिक्षण तसेच पदवीधर मतदारसंघासाठी नवीन नोंदणी केली जात आहे. या मोहिमा यशस्वी करण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक असल्याने २ आॅक्टोबर रोजी दरवर्षी होणाऱ्या ग्रामसभा पाहता, निव्वळ मतदार जागृती करण्यासाठी १ आॅक्टोबर रोजीदेखील ग्रामसभा घेण्याचे आदेश ग्रामसेवकांना देण्यात आले होते. या ग्रामसभांमध्ये महिलांच्या ग्रामसभांचादेखील समावेश होता, (प्रतिनिधी)

Web Title: Gram Sabha again on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.