ग्रामपंचायतीचा कर भरणाऱ्यांना मिळणार पाण्याचा जार, केशर आंबा रोपाची भेट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:30 IST2020-07-27T21:50:44+5:302020-07-28T00:30:55+5:30
सिन्नर : कोरोना संसर्गामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करवसुलीमध्ये मोठ्या प्रमाणावर तूट निर्माण झाली असून, ग्रामपंचायतींना त्याचा मोठा फटका बसला आहे. शिवाय शासनाने ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांना वेतनासाठी करवसुलीचे लक्ष्य दिल्याने तालुक्यातील घोरवड ग्रामपंचायतीने करवसुलीसाठी आगळी-वेगळी शक्कल लढवली आहे. ग्रामपंचायतीने थकबाकीसह संपूर्ण कर भरणाऱ्यांना २० लिटर पाण्याचा जार व केशर अंब्याचे रोप भेट देण्याचा उपक्रम राबवला आहे.

ग्रामपंचायतीचा कर भरणाऱ्यांना मिळणार पाण्याचा जार, केशर आंबा रोपाची भेट !
सिन्नर : कोरोना संसर्गामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करवसुलीमध्ये मोठ्या प्रमाणावर तूट निर्माण झाली असून, ग्रामपंचायतींना त्याचा मोठा फटका बसला आहे. शिवाय शासनाने ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांना वेतनासाठी करवसुलीचे लक्ष्य दिल्याने तालुक्यातील घोरवड ग्रामपंचायतीने करवसुलीसाठी आगळी-वेगळी शक्कल लढवली आहे. ग्रामपंचायतीने थकबाकीसह संपूर्ण कर भरणाऱ्यांना २० लिटर पाण्याचा जार व केशर अंब्याचे रोप भेट देण्याचा उपक्रम राबवला आहे.
घोरवड ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कर भरणा, प्रोत्साहन लाभ योजना जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत १५ जुलैपर्यंत ३१ मार्च २०२१ अखेर थकबाकीसह संपूर्ण घरपट्टी, पाणीपट्टी भरणा केलेल्या खतेदारांना २० लिटर पाण्याचा जार व केशर आंब्याचे रोप भेट स्वरूपात देण्यात आले.
डोंगरी विकास निधीतून मंजूर अंगणवाडी इमारत बांधकाम व ग्रामपंचायत उत्पन्न स्वनिधीतून श्री क्षेत्र प्रयागराज तीर्थाजवळील सार्वजनिक जागेचे सुशोभिकरण, पायºया व भिंत बांधकाम या कामांचे सरपंच रमेश रामनाथ हगवणे, उपसरपंच सुदाम म्हसाळ, ग्रामपंचायत सदस्य दामू साबळे, अंबादास भुजबळ, प्रयाग अनाथ चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामदास हगवणे, उपाध्यक्ष हरिभाऊ हगवणे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी वनिता हगवणे,
संगीता मंडलिक, ज्योती हगवणे, सविता वलहामते, चंद्रकला लहामटे, सोमनाथ गायकवाड, ग्रामसेवक योगेश चित्ते आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
------------------
आशासेविकांचा सन्मान
ग्रामपंचायतीच्या ५ टक्के दिव्यांग कल्याण निधीतून १० दिव्यांग महिला-पुरुषांना अर्थसाहाय्य धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी कोरोना महामारीविरुद्ध लढणाºया आशासेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी या कोरोनायोद्ध्यांंचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला.