ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे गुरुवारी उपोषण

By Admin | Updated: May 18, 2014 00:28 IST2014-05-17T23:52:21+5:302014-05-18T00:28:03+5:30

नाशिक- ग्रामपंचायत कामगारांच्या वेतनातील सुधारणा आणि अन्य मागण्यांची त्वरित अंमलबजावणी व्हावी, यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने येत्या गुरुवारपासून (दि.२२) नांदगाव पंचायत समितीच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

Gram Panchayat employees Thursday fasting | ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे गुरुवारी उपोषण

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे गुरुवारी उपोषण

नाशिक- ग्रामपंचायत कामगारांच्या वेतनातील सुधारणा आणि अन्य मागण्यांची त्वरित अंमलबजावणी व्हावी, यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने येत्या गुरुवारपासून (दि.२२) नांदगाव पंचायत समितीच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
शासनाच्या वतीने गेल्यावर्षी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना किमान वेतनाचे दर सुधारित करण्यात आले आहेत; परंतु अद्याप कोणत्याही ग्रामपंचायतीने अशा प्रकारे वेतनात सुधारणा केलेली नाही. त्याचप्रमाणे कामगार आयुक्त कार्यालयाने विशेष भत्त्याचे दर निश्चित केले असताना ते देखील दिले जात नाही. सुधारित वेतन आणि विशेष भत्त्यातील थकीत रक्कम त्वरित द्यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे सेवा पुस्तक अद्ययावत करण्यात आलेले नाही आणि भविष्य निर्वाह निधीचे खातेदेखील उघडण्यात आलेले नाही, ते उघडावे अशादेखील संघटनेच्या मागण्या असल्याचे युनियनचे अध्यक्ष पंुजाभाऊ राऊत आणि सचिव कृषा बावने यांनी म्हटले आहे.

Web Title: Gram Panchayat employees Thursday fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.