शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
4
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
5
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
6
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
7
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
8
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
9
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
10
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

गटातटाच्या राजकारणाने रंगणार ग्रामपंचायत निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 8:13 PM

कळवण : अभोणा, कनाशी, पाळे बु, सप्तशृंगी गड, ओतूर यांच्यासह कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. गटातटाच्या राजकारणाने निवडणूक रंगणार असून वर्चस्ववादाची लढाई आतापासूनच पाहायला मिळू लागली आहे.दरम्यान, ग्रामस्थांमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये यासाठी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी स्थानिक पातळीवर ज्येष्ठ मंडळी प्रयत्नशील आहेत. युवा वर्गात मात्र निवडणूक लढविण्यासाठी बळ दिले जात असल्याने लढती चुरशीच्या ठरण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकळवण : तालुक्यातील २९ ठिकाणी रणधुमाळी सुरु

कळवण तालुक्यात आजवर पक्षीय स्तरावर निवडणुका झालेल्या नाहीत. परंतु झाल्यास महाविकास आघाडी विरुद्ध भाजप व माकप छुपी युतीत लढती होतील. आतापर्यंत झालेल्या निवडणुका गावपातळीवर गटातटात व भाऊबंदकीच्या वातावरणात झाल्या आहेत. कळवण तालुका शंभर टक्के आदिवासी उपयोजनेत असल्यामुळे सरपंचपद हे सर्वत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे शिवाय ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोग व्यतिरिक्त आदिवासी उपयोजना व पेसामधून निधी मिळत असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.कनाशीमध्ये कळवण पंचायत समितीचे उपसभापती विजय शिरसाठ, माजी सरपंच नितीन बोरसे, अंबादास देसाई, राकेश गोविंद, भूषण देसाई तर अभोण्यात सरपंच मीराबाई पवार, शिरीष शहा, मनोज वेढणे, सुनील खैरनार, विकास गावीत, सोमनाथ सोनवणे, मुन्ना पाटील, ओतूरमध्ये रविकांत सोनवणे, अशोक देशमुख, दिगंबर पवार, दादा मोरे, शबाण पठाण, देवा भुजाडे, पाळे बु मध्ये जेष्ठ नेते वाय. एस. देशमुख, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, रवी परदेशी, सप्तश्रुंगी गडावर शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गिरीश गवळी, संदीप बेनके, सरपंच राजेश गवळी, जगन बर्डे, अजय दुबे, शांताराम सदगीर, बाळासाहेब व्हरंगळ, तुषार बर्डे तर नांदुरीत सुभाष राऊत, भाऊ कानडे, किरण अहिरे, भाजपच्या महिला आघाडी तालुकाध्यक्ष सोनाली जाधव या स्थानिक पातळीवरील नेत्यांची राजकीय कसोटी लागणार आहे.या गावात होणार निवडणुकाकळवण तालुक्यातील अभोणा, कनाशी, ओतूर, पाळे बु, सप्तश्रुंगी गड, नांदुरी, मेहदर, नरुळ, भुसणी, मुळाणेवणी, बापखेडा, तताणी, मोहनदरी, भगुर्डी, पळसदर, मोहमुख, ओझर, लिंगामे, विरशेत, वडाळे(हा), बोरदैवत, जामलेवणी, कळमथे, सावकीपाळे, बिलवाडी, देवळीवणी, कुंडाणे(क), काठरे, गोसराणे या महत्वपूर्ण गावांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.२५ सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणारविधानसभा मतदारसंघाची २५ सप्टेंबर २०२० रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत