ब्रह्मा व्हॅली महाविद्यालयात पदवीग्रहण समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:52 IST2018-02-27T23:52:21+5:302018-02-27T23:52:21+5:30

त्र्यंबकेश्वर : ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलात विद्यापीठाचा तृतीय पदवीग्रहण समारंभ अविनाश सिसोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

The graduation ceremony at the University of Brahma Valley | ब्रह्मा व्हॅली महाविद्यालयात पदवीग्रहण समारंभ

ब्रह्मा व्हॅली महाविद्यालयात पदवीग्रहण समारंभ

त्र्यंबकेश्वर : येथील ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलातील अभियांत्रिकी महाविद्यालय, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय व शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा तृतीय पदवीग्रहण समारंभ अविनाश सिसोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर पवार, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक प्रा. सी. के. पाटील, औषधनिर्माणशास्त्राचे प्राचार्य डॉ. जी. एस. तळेले, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. व्ही. एम. शेलार, पब्लिक स्कूलचे संचालक गुंजन सिंग, सर्व विभागप्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा. सी. के. पाटील यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: The graduation ceremony at the University of Brahma Valley