आबड-लोढा जैन महाविद्यालयात पदवीग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:06 IST2018-03-05T00:06:33+5:302018-03-05T00:06:33+5:30
चांदवड : मानवी हिताचे संशोधनाचे प्रश्न आपल्या हृदयात निर्माण व्हावे, देश व समाज याला लक्ष्य मानून आपण सर्जनशील होणं हे येणाºया काळात महत्त्वाचे आहे.

आबड-लोढा जैन महाविद्यालयात पदवीग्रहण
चांदवड : मानवी हिताचे संशोधनाचे प्रश्न आपल्या हृदयात निर्माण व्हावे, देश व समाज याला लक्ष्य मानून आपण सर्जनशील होणं हे येणाºया काळात महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जळगाव विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक, समीक्षक डॉ. केशव तुपे यांनी केले.
आबड-लोढा जैन महाविद्यालय, श्री. सुरेशदादा जैन औषधनिर्माण महाविद्यालय, सौ. कांताबाई जैन अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदवीग्रहण समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे मानद सचिव जवाहरलाल आबड होते. पुणे विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. प्रमोद भडकवाडे, विख्यात सर्जन डॉ. रोहन बोरसे, आय.टी. मॅनेजर नितीन पाटील, संस्थेचे संचालक व सहमानद सचिव झुंबरलाल भंडारी, महावीर पारख, प्रशासकीय अधिकारी पी.पी. गाळणकर, प्राचार्य डॉ. एम.डी. कोकाटे, प्राचार्य डॉ. सी.डी. उपासनी, प्राचार्य डॉ. जी.एच. जैन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एम.डी. कोकाटे यांनी केले.
पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. सी.डी. उपासनी व डॉ. सुदीन दळवे यांनी केला. यावेळी बोलताना डॉ. प्रमोद भडकवाडे यांनी सांगितले की, पूर्वी पदवीदान शब्द होता; मात्र दान ही याचना असते. पदवीग्रहणमध्ये हक्क, अधिकार आहे म्हणून हा पदवीग्रहण समारंभ आहे. पदवी घेऊन न थांबता पुढे जा, नवनवीन संधी व आव्हाने स्वीकारा. डॉ. केशव तुपे यांनी सांगितले की, . नेमिनाथ जैन संस्था हे अभिमत विद्यापीठ व्हावे, इतके दर्जेदार काम त्यांनी उभारले आहे.
जवाहरलाल आबड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. जी.एच. जैन यांनी आभार मानले. यानंतर पदवीग्रहण समारंभाची सूत्रे डॉ. विशाल गुळेचा, डॉ. सुदीन दळवे, डॉ. दीपक पाटील, डॉ. संजय पाटील यांनी सांभाळलीत, तर सूत्रसंचालन डॉ. तुषार चांदवडकर यांनी केले.