शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

‘मनविसे’कडून घेराव : नाशिक आयटीआय येथे ‘आयसीटीएसएम’ परिक्षेत गोंधळा; ९५ टक्के विद्यार्थी नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 13:51 IST

उपसंचालक सूर्यवंशी यांनी सदर बाबीची  दखल घेत, १ महिन्याच्या आत सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा नव्याने परीक्षा घेण्यात येईल तसेच परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना  ८ दिवस प्रशिक्षण देऊन नंतर परीक्षा घेण्यात येईल व या परीक्षेसाठी लागणारी फी संदर्भात वरिष्ठ अधिका-र्यांशी चर्चा करून ती कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.

ठळक मुद्दे९५ टक्के विद्यार्थी नापास १ महिन्याच्या आत सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा नव्याने परीक्षा

नाशिक : आयसीटीएसएमच्या लेखी व गणित विषयाच्या पेपरला ऐनवेळी बदल करुन दोन दिवस पुढे ढकलण्यात आला. कुठलीही सुचना न देता परीक्षा ऐनवेळी घेतली गेली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होऊन सुमारे ९५ टक्के विद्यार्थी नापास झाले. याप्रकरणी प्रशासन दोषी असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानास कारणीभूत असल्याचा आरोप ‘मनविसे’कडून करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आयटीआय उपसंचालक सुर्यवंशी यांना जाब विचारण्यात आला. यावेळी विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनात ठिय्या देऊन घेराव घातला. परीक्षा ओएमआर पध्दतीने पुन्हा विनामुल्य घेतली जावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. आय.सी.टी.एस.एम.व्यवसायाच्या परीक्षेत झालेला गोंधळा बाबत मनविसे पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानी बाबत निर्दशनास आणून दिले. यावेळी उपसंचालक सूर्यवंशी यांनी सदर बाबीची  दखल घेत, १ महिन्याच्या आत सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा नव्याने परीक्षा घेण्यात येईल तसेच परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना  ८ दिवस प्रशिक्षण देऊन नंतर परीक्षा घेण्यात येईल व या परीक्षेसाठी लागणारी फी संदर्भात वरिष्ठ अधिका-र्यांशी चर्चा करून ती कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, मनविसे जिल्हाध्यक्ष दिपक चव्हाण ,जिल्हा सरचिटणीस शशी चौधरी, जिल्हा सरचिटणीस गणेश मंडलिक, एजाज शेख, सौरभ सोनवणे , नितीन धानापुने, सागर निगळ आदि पदाधिकारी उपस्थित होते .

टॅग्स :NashikनाशिकMNSमनसेStudentविद्यार्थीiti collegeआयटीआय कॉलेज