राज्यपालांच्या हस्ते गोदावरीपूजन
By Admin | Updated: September 5, 2015 00:04 IST2015-09-05T00:02:48+5:302015-09-05T00:04:01+5:30
राज्यपालांच्या हस्ते गोदावरीपूजन

राज्यपालांच्या हस्ते गोदावरीपूजन
रामकुंड : विश्वकल्याण, पर्जन्यवृष्टीचा संकल्पनाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव व त्यांच्या पत्नी सी.विनोधा राव यांनी आज सकाळी पवित्र रामकुंडावर येऊन गोदावरीपूजन केले. तसेच विश्वकल्याण व देशभरात समाधानकारक पर्जन्यवृष्टीचा संकल्प सोडला.
सकाळी १० वाजून २० मिनिटांनी राज्यपालांचे रामकुंडावर सपत्नीक आगमन झाले. श्री गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी वेदमंत्रांच्या उद्घोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी विधिवत गोदावरीपूजन करण्यात आले. तसेच कुंभमेळा ध्वजस्तंभाचेही पूजन झाले. अतुल गायधनी, अमित गायधनी, चंद्रशेखर पंचाक्षरी, विनायक गायधनी, नितीन पाराशरे आदिंनी पौरोहित्य केले. यावेळी राज्यपालांनी गोदावरी माता मंदिरात दर्शन घेतले. पुरोहित संघाच्या वतीने त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. १० वाजून ३६ मिनिटांनी राज्यपालांनी रामकुंडावरून प्रयाण केले.
यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन आदि अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)