सामूहिक वन दाव्यांना सकारात्मक प्रतिसाद राज्यपाल घेणार आढावा : अधिकाऱ्यांची धांदल
By Admin | Updated: January 18, 2015 01:29 IST2015-01-18T01:29:02+5:302015-01-18T01:29:39+5:30
सामूहिक वन दाव्यांना सकारात्मक प्रतिसाद राज्यपाल घेणार आढावा : अधिकाऱ्यांची धांदल

सामूहिक वन दाव्यांना सकारात्मक प्रतिसाद राज्यपाल घेणार आढावा : अधिकाऱ्यांची धांदल
नाशिक : महिनाअखेरीस नाशिक भेटीवर येत असलेल्या राज्यपालांनी पेसा कायदा व सामूहिक वन हक्क दाव्यांचा आढावा घेण्याचे अगोदरच सूचित केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली असून, एरव्ही वन हक्क दाव्यांच्या बैठकांना गैरहजर राहणाऱ्या आदिवासी व वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी शनिवारच्या बैठकीत आवर्जून हजेरी लावत सकारात्मक पावले उचलली आहेत. नाशिक जिल्'ात आठ तालुके आदिवासी असूनही सामूहिक वन हक्कासाठी अगदीच बोटावर मोजण्याइतके दावे दाखल झाल्याची बाब काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत उघडकीस आल्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सामूहिक वन हक्क दाव्यांना प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. सामूहिक वन हक्क दाव्यांचे दोन प्रकार असून, एका प्रकारात सार्वजनिक वापरासाठी वन खात्याच्या जागा ताब्यात देण्यात येणार आहे.