शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

‘लोकमत’च्या वृत्तानंतर शासन हलले; गजलक्ष्मीवर करणार उपचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 17:19 IST

‘लोकमत’मध्ये ‘विव्हळणा-या गजलक्ष्मीचा मूक आक्रोश’ या नावाने सचित्र वृत्त प्रसारित करण्यात आले होते. वृत्तात लक्ष्मीच्या वेदना अन् तिची होत असलेली फरफट याविषयीची माहिती दिली होती.

ठळक मुद्दे'लोकमत'च्या या वृत्तानंतर वनमंत्रालयानेच दखल घेत लक्ष्मीवर योग्य उपचार करण्याचे आदेश दिले मुख्य वनसंरक्षक एस. व्ही रामराव यांनी वनमंत्र्यांच्या आदेशानंतर समिती गठित केली मुंबई भायखळा प्राणिसंग्रहालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपचारासाठी नाशिकमध्ये येणार

सतीश डोंगरे ।नाशिक : शरीरावरील असंख्य जखमांनी विव्हळणाऱ्या लक्ष्मी नावाच्या हत्तिणीचा मूक आक्रोश ‘लोकमत’ने मांडल्यानंतर शासन हलले आहे. याप्रकरणाची वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी दखल घेत ‘लक्ष्मी’वर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर लक्ष्मीचा सांभाळ करणा-या संबंधिताने तिची योग्य देखभाल न केल्यास त्याचा परवाना रद्द करण्याच्या सूचनाही वनखात्याला दिल्या आहेत.‘लोकमत’मध्ये ‘विव्हळणा-या गजलक्ष्मीचा मूक आक्रोश’ या नावाने सचित्र वृत्त प्रसारित करण्यात आले होते. वृत्तात लक्ष्मीच्या वेदना अन् तिची होत असलेली फरफट याविषयीची माहिती दिली होती. त्याचबरोबर वनविभागाच्या अनास्थेकडेही लक्ष वेधले होते. या वृत्तानंतर प्राणिमित्रांमध्येही लक्ष्मीच्या सुटकेसाठी एकजूट झाल्याचे दिसून आले. ‘आवास’ या प्राण्यांसाठी काम करणाºया संस्थेचे अध्यक्ष गौरव क्षत्रिय यांनी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘लक्ष्मीला वाचवा’ या नावाने एक चळवळच उभी केली होती.

ALSO READ : स्वार्थी दुनियादारी : विव्हळणाऱ्या ‘गज’लक्ष्मीचा मूक आक्रोश

दरम्यान, लोकमतच्या या वृत्तानंतर वनमंत्रालयानेच याप्रकरणाची दखल घेत लक्ष्मीवर योग्य ते उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी लोकमतशी बोलताना म्हटले की, लक्ष्मीवर तातडीने योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर संबंधित व्यक्तीने पुढील काळात तिची योग्य ती देखभाल न केल्यास त्याचा परवाना रद्द करण्याबाबतही सरकारी पातळीवर विचार केला जाणार आहे. उपचारासाठी लागणारा निधी सरकारी स्तरावर कमी पडल्यास विशेष कल्याणकारी निधीतून लक्ष्मीवर उपचार केले जातील.

ALSO READ : गजलक्ष्मीच्या सुटकेसाठी आता सोशल चळवळ

दरम्यान, नाशिक वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही रामराव यांनी वनमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने एक समिती गठित केली असून, त्यामध्ये डॉक्टरांचाही समावेश केला आहे. मुंबई भायखळा येथील प्राणिसंग्रहालयातील काही तज्ज्ञ डॉक्टरांची टीम लक्ष्मीच्या उपचारासाठी नाशिकमध्ये येणार असल्याचे त्यांनी सांगिंतले आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवNashikनाशिकforest departmentवनविभाग