नाशिकच्या साहित्य संमेलनासाठी शासनाकडून ५० लाख रुपयांचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:46 IST2021-02-05T05:46:01+5:302021-02-05T05:46:01+5:30

नाशिक : शहरात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री ...

Government provides Rs. 50 lakhs for Sahitya Sammelan in Nashik | नाशिकच्या साहित्य संमेलनासाठी शासनाकडून ५० लाख रुपयांचे अनुदान

नाशिकच्या साहित्य संमेलनासाठी शासनाकडून ५० लाख रुपयांचे अनुदान

नाशिक : शहरात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दिनांक २६ ते २८ मार्चदरम्यान हे संमेलन नाशिक येथे गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होत असून, ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे आयोजित करण्यात येत असून, लोकहितवादी मंडळ, नाशिक यांनी या संमेलनाच्या आयोजनासाठी निमंत्रण दिले आहे. गेल्या वर्षभरापासून आपण कोविडचा लढा लढत असून, परिस्थितीत झपाट्याने सुधारणा होत आहे. या पार्श्वभूमीवर हे साहित्य संमेलन आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन पार पाडले जाईल तसेच या संमेलनामुळे मराठी साहित्य विश्वात परत एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण होईल, अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. त्यांनी या संमेलनाच्या आयोजनाला शुभेच्छाही दिल्या. डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारखा महान खगोलशास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ साहित्यिक या संमेलनाच्या अध्यक्षपदी लाभल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला.

Web Title: Government provides Rs. 50 lakhs for Sahitya Sammelan in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.