पाथरवट लेनमधील दोघांकडून गावठी कट्टा जप्त

By Admin | Updated: June 12, 2017 16:39 IST2017-06-12T16:39:52+5:302017-06-12T16:39:52+5:30

पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पाथरवट लेनमधील दोघा संशयितांकडून सोमवारी (दि़१२) पहाटे गावठी कट्टा, जिवंत काडतूस व धारदार शस्त्रे जप्त केली.

Gothi Katta seized from both the stone lane | पाथरवट लेनमधील दोघांकडून गावठी कट्टा जप्त

पाथरवट लेनमधील दोघांकडून गावठी कट्टा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पाथरवट लेनमधील दोघा संशयितांकडून सोमवारी (दि़१२) पहाटे गावठी कट्टा, जिवंत काडतूस व धारदार शस्त्रे जप्त केली. आकाश लाटे व विनायक लाटे (रा़ पाथरवट लेन) अशी दोघा संशयितांची नावे असून, या दोघांनाही अटक करण्यात आली आहे़
सोमवारी पहाटेच्या सुमाराला हिरावाडी परिसरात दोन संशयित शस्त्रास्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी गस्त घालीत असताना हिरावाडी परिसरातील त्रिकोणी बंगल्याजवळ संशयित आकाश लाटे व विनायक लाटे हे संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आले़ पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन धारदार शस्त्रे, एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस आढळून आले़
या दोघाही संशयितांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यापूर्वी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत़.

Web Title: Gothi Katta seized from both the stone lane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.