शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

शुभवर्तमान : महापालिका शाळांमधील सुखद कामगिरी; शंभर टक्के यश महिला शिक्षक झाल्या ‘तंत्रस्नेही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 12:38 AM

डिजिटलच्या जमान्यात महापालिकाच्या शाळांनीही मागे राहून कसे चालेल? तंत्रज्ञान गुणाकाराच्या पटीत बदलत असताना अध्यापनासाठी विविध व विपुल शैक्षणिक साधनांचा वापर कल्पकतेने व्हावा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाचे सुलभीकरण व्हावे याकरिता महापालिकेच्या शाळांमधील सर्वच्या सर्व ६५८ महिला शिक्षकांना तंत्रस्नेही (टेक्नोसॅव्ही) करण्यात यश आलेले आहे.

ठळक मुद्देशहरात १२७ शाळा चालविल्या जातात९५० शिक्षकांपैकी ६५८ महिला शिक्षक महिला शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला

नाशिक : डिजिटलच्या जमान्यात महापालिकाच्या शाळांनीही मागे राहून कसे चालेल? तंत्रज्ञान गुणाकाराच्या पटीत बदलत असताना अध्यापनासाठी विविध व विपुल शैक्षणिक साधनांचा वापर कल्पकतेने व्हावा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाचे सुलभीकरण व्हावे याकरिता महापालिकेच्या शाळांमधील सर्वच्या सर्व ६५८ महिला शिक्षकांना तंत्रस्नेही (टेक्नोसॅव्ही) करण्यात यश आलेले आहे. त्याचा लाभ तंत्रस्नेही विद्यार्थी तयार करण्यासाठी होणार आहे. महापालिकेतील शाळांमधील ही कामगिरी सुखद वार्ता ठरली असून, तंत्रस्नेही शिक्षकांची फळी निर्माण करणारी राज्यातील बहुधा पहिली महापालिका असावी.महापालिकेच्या वतीने शहरात १२७ शाळा चालविल्या जातात. या शाळांमधील सुमारे ९५० शिक्षकांपैकी ६५८ महिला शिक्षक आहेत. शासनाच्या धोरणानुसार, शिक्षकांनीही तंत्रस्नेही होत त्याचा अध्यापनात प्रभावीपणे वापर केला पाहिजे. त्याचाच आधार घेत नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाने महिला शिक्षकांना तंत्रस्नेही करण्याचा विडाच उचलला. त्यासाठी अगोदर तंत्रज्ञानाशी अवगत असलेल्या चार महिला शिक्षकांची निवड करण्यात आली. या महिला शिक्षकांनी शहरातील नामवंत खासगी शाळांमधील अद्ययावत लॅबच्या माध्यमातून विभागनिहाय व केंद्रनिहाय मनपा शाळांमधील महिला शिक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या. प्रात्यक्षिकासह तंत्रज्ञानाची माहिती या कार्यशाळांमधून देण्यात आली. जुलै ते सप्टेंबर २०१७ या तीन महिन्यांच्या कालावधीत घेण्यात आलेल्या या कार्यशाळांमध्ये २२ वयोगटापासून ते निवृत्तीकडे झुकलेल्या महिला शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. सर्व्हर कसे आॅपरेट करावे, अपलोड सिस्टम, यूट्यूब, ब्लॉग, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक याँसारख्या सोशल मीडियाचा कशा प्रकारे वापर करून घ्यावा याची माहिती देण्यात आली. शिक्षकांना काही प्रकल्प तयार करण्यास सांगण्यात आले. ज्या कविता सर्वच स्तरावर चालू शकतील अशा कविता संगीतबद्ध करून त्यांचे फोल्डर तयार करण्यात आले. सदर कविता त्यामुळे एकाच सुरात व एकाच तालात सर्वत्र गाता येऊ शकतील. या कार्यशाळांतून महापालिकेच्या सर्वच्या सर्व ६५८ महिला शिक्षक आता तंत्रस्नेही बनल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.