गोरोबा संस्थेतर्फे आदिवासींना कपडे, फराळ वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:20 AM2018-11-17T00:20:54+5:302018-11-17T00:21:35+5:30

वडनेरदुमाला येथील श्री गोरोबा सामाजिक संस्थेच्या वतीने पेठ तालुक्यातील तीळभाट, करंजाळे येथे दिवाळीनिमित्त कपडे व फराळाचे वाटप करण्यात आले.

The Goroba Organization distributes clothes, lunch to the tribals | गोरोबा संस्थेतर्फे आदिवासींना कपडे, फराळ वाटप

निमा वुमेन्स फोरमच्या वतीने मास्तरवाडी आणि पत्र्याचापाडा या दोन आदिवासी पाड्यांवर दिवाळीनिमित्त फराळ, कपडे, स्वच्छतेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले याप्रसंगी डॉ. नीलिमा राजगुरू, डॉ. माधवी लोंढे आदि. डॉ. प्रणीता गुजराथी मुकुंद दीक्षित, वासंती दीक्षित, डॉ. शरद पाटील, तुषार महाजन, डॉ. धनंजय गुजराथी,

Next

नाशिकरोड : वडनेरदुमाला येथील श्री गोरोबा सामाजिक संस्थेच्या वतीने पेठ तालुक्यातील तीळभाट, करंजाळे येथे दिवाळीनिमित्त कपडे व फराळाचे वाटप करण्यात आले.
श्री गोरोबा सामाजिक संस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त तीळभाट गावात आदिवासी कुटुंबीयांना दिवाळी फराळ व कपडे वाटप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीसपाटील नारायण भोये, दिनकर भोये, सीताबाई चौधरी, अश्विनी राऊत, चंदर भोये, महादू भोये, श्री गोरोबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय जोर्वेकर, सरचिटणीस पंकज जावरे आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ, कपडे, महिलांना साड्या, मुलांना फटाके आदींचे वाटप करण्यात आले.
आभार खजिनदार प्रशांत रसाळ यांनी मानले. यावेळी अशोक आडके, सोमनाथ सोनवणे, अरविंद गीत, यशवंत नरोटे, लीलाधर शिंपी, बाळासाहेब जोर्वेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
आधारतीर्थ आश्रमात
फराळाचे वाटप
मराठा मावळा संघटनेच्या वतीने दीपावली सणानिमित्त त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करून महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमात राज्यातील काही आत्महत्याग्रस्त शेतकºयांची मुले शिकण्यास आहेत. मराठा मावळा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष छाया झाडे, महिला उपाध्यक्ष वैशाली कोल्हे, कार्याध्यक्ष नीता शिंदे आदींंनी आधारतीर्थ आश्रमात जाऊन विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळी सण उत्साहात साजरा केला.
वुमेन्स फोरमची आदिवासींसोबत दिवाळी
निमा वुमेन्स फोरमच्या वतीने घोटी-त्र्यंबक रस्त्यावरील मास्तरवाडी आणि पत्र्याचापाडा या दोन आदिवासी पाड्यांवर दिवाळीनिमित्त फराळ, कपडे, स्वच्छतेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले व त्याचबरोबर सकस पोषक आहार याविषयी डॉ. नीलिमा राजगुरू यांनी मार्गदर्शन केले. डॉ. माधवी लोंढे यांनी गावकºयांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. यावेळी आदिवासींना फोरमच्या अध्यक्ष डॉ. प्रणीता गुजराथी यांनी रुबेला व मिसेल्स लसीकरणाबाबत जनजागृती तसेच त्याचे महत्त्वही विषद करण्यात आले. कार्यक्रमास मुकुंद दीक्षित, वासंती दीक्षित, डॉ. शरद पाटील, तुषार महाजन, डॉ. धनंजय गुजराथी, डॉ. विनोद गुजराथी, डॉ. दीप्ती बढे, डॉ. माधुरी करमरकर, शुभदा जगदाळे, अपर्णा देशपांडे, माधवी लोंढे, नीलिमा राजगुरू, अश्विनी पवार, संध्या परदेशी उपस्थित होते.

Web Title: The Goroba Organization distributes clothes, lunch to the tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.