गोधन चोरट्यास जुन्या नाशकात अटक
By Admin | Updated: January 21, 2016 23:31 IST2016-01-21T23:30:29+5:302016-01-21T23:31:17+5:30
गोधन चोरट्यास जुन्या नाशकात अटक

गोधन चोरट्यास जुन्या नाशकात अटक
नाशिक : नानावली येथील एका मैदानातून कत्तलीसाठी गोधन चोरी करून घेऊन जात असल्याचे भद्रकाली पोलिसांना गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आढळून आले.
यावेळी पोलिसांनी आदम कचरूभाई शेख (वय ४५, रा. चौकमंडई) यास अटक केली
आहे. त्यावर भारतीय प्राणीसंरक्षण कायद्यान्वये भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख हा एक गाय, गोऱ्हा व दोन वासरे असे एकूण ६५ हजार रुपये किमतीचे गोधन चोरून नेत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)