दारूबंदीसाठी महिलांची गावफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:06 IST2018-01-28T23:24:26+5:302018-01-29T00:06:26+5:30
तळवाडे गावात आणि गाव परिसरात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याने ते व्यवसाय करणाºयांनी तत्काळ बंद करावेत, गावात दारू पिऊन धिंगाणा घालणाºया मद्यपींनी दारू पिऊन गावात भांडणे करू नये. गावात, गल्लीत गोंधळ घालू नये अशी सक्त ताकीद आणि सज्जड दम तळवाडे येथील महिलांनी गावात जागृती फेरी मारून दिली.

दारूबंदीसाठी महिलांची गावफेरी
सायखेडा : तळवाडे गावात आणि गाव परिसरात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याने ते व्यवसाय करणाºयांनी तत्काळ बंद करावेत, गावात दारू पिऊन धिंगाणा घालणाºया मद्यपींनी दारू पिऊन गावात भांडणे करू नये. गावात, गल्लीत गोंधळ घालू नये अशी सक्त ताकीद आणि सज्जड दम तळवाडे येथील महिलांनी गावात जागृती फेरी मारून दिली. गावात अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्र ी सुरू आहे. गावातील तरुण पिढीला दारूचे व्यसन जडत आहे. अनेक वयस्कर माणसेदेखील दारूच्या नशेत असतात. कुटुंबात सतत वाद सुरू असल्याने अनेक कुटुंबे रस्त्यावर येऊ लागली आहेत, तर अनेक तरुण दारू पिऊन गाडी चालवित असल्याने आपघाताचे प्रमाण वाढत आहे. अनेक वेळा गावात ग्रामसभा घेऊन दारूबंदीचे ठराव करण्यात आले. सायखेडा पोलीस ठाण्यात निवेदने देण्यात आली; मात्र दारू विक्री करणाºयांचे हात वरपर्यंत असल्याने दारूबंदी होत नसल्याची चर्चा सुरू आहे. गावातील महिला मात्र आता दारूबंदीसाठी पुढे सरसावल्या आहेत. गावात विशेष ग्रामसभा घेऊन पुन्हा एकदा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. गावातील महिलांनी संघटित होऊन गावात दारूबंदीसाठी फेरी मारली. दारू विक्री करणाºया व्यावसायिकांना सज्जड दम दिला आहे. गावात दारू पिऊन धिंगाणा घालणाºया मद्यपींना चोप देणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. गावातील महिला सरसावल्या असल्याने पुरुषांनी पुढे येऊन साथ देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामसभेच्या ठरावाची प्रत ठाणे अंमलदार पेखळे यांना देण्यात आली आहे.
गावात अवैध दारू विक्र ी सुरू असल्याने दिवसभर दारूड्यांचा सुळसुळाट गावात असतो. अनेक कुटुंबांमध्ये भांडणे होतात, त्यामुळे संसार उघड्यावर येत आहे, तरु ण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे दारू विक्र ी बंद करण्यात यावी अन्यथा महिला सामुदायिक हल्ला करतील. - लता सांगळे, सरपंच, तळवाडे