तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत गोपाल विद्यालयाचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:34 IST2019-08-18T00:33:48+5:302019-08-18T00:34:41+5:30
सिन्नर : तालुक्यातील पिंपळे येथील गोपाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याने त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सिन्नर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत पिंपळे येथील गोपाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. त्याप्रसंगी यशस्वी खेळाडूंसह मुख्याध्यापक तुकाराम सदगीर, व्ही. बी. जगधने, एल. डी. बेणके, सी. एन. पगार, ए. एन. इनामदार, व्ही. के. वारूंगसे, दिलीप बिन्नर, दत्तू बिन्नर आदी.
सिन्नर : तालुक्यातील पिंपळे येथील गोपाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याने त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा विभागामार्फत सिन्नर महाविद्यालयात पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या फ्री स्टाइल कुस्ती स्पर्धेत ३३ किलो वजनीगटात तेजल शिवाजी बिन्नर हिने प्रथम क्र मांक पटकावला. १७ वर्षाखालील मुलांच्या ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत ५१ किलो वजनीगटात सौरभ तुकाराम बिन्नर व ९१ किलो वजनीगटात करण भाऊपाटील पानसरे याने प्रथम क्रमांक मिळवला. सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना क्र ीडाशिक्षक एल. डी. बेणके यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष श्री. डॉ. टी. के. सदगीर, मारूती बिन्नर, डॉ. राजेंद्र बिन्नर, बन्सी बिन्नर, पोपट रूपवते, सुभाष घुगे यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.