येवला तालुक्यात दुग्ध व्यवसायाला अच्छे दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:52 IST2020-02-23T23:17:47+5:302020-02-24T00:52:20+5:30
दत्ता महाले । येवला : पिवळं सोनं काळवंडलं आणि कांद्याच्या वजनासह दरात घट होत असली तरी, दुभती जनावरे शेतकऱ्याला ...

येवला तालुक्यात दुग्ध व्यवसायाला अच्छे दिन
दत्ता महाले ।
येवला : पिवळं सोनं काळवंडलं आणि कांद्याच्या वजनासह दरात घट होत असली तरी, दुभती जनावरे शेतकऱ्याला मोठा आधार ठरत असल्याचे चित्र येवला तालुक्यात दिसून येत आहे. धवल क्र ांतीला सुगीचे दिवस असून, गायीच्या दुधाला ३० ते ३५ रुपयांचा दर मिळत असल्याने दूध उत्पादक खुश आहेत, त्यामुळे शेतात कमी पिकलं तरी किमान दोन पैसे तरी दुधाच्या रूपाने शेतकºयाला मिळत आहेत.
दुधाळ जनावरांचे दर मात्र गगनाला भिडले आहेत. चांगल्या प्रतीच्या संकरित गायीची ५० ते ८० हजार रुपयांपर्यंत खरेदी-विक्री होत आहे. येवला येथील मंगळवारच्या आठवडे बाजारात संकरित गायी खरेदी करण्याऐवजी थेट शेत शिवारात जाऊन गाय किती दूध देते यावर तिचा दर ठरवण्याला शेतकरी अधिक पसंती देत असल्याचे चित्र दिसत आहे. ढेपीसह हिरवा चारा असेल तर जनावरे दुधाला चांगलीच उतरतात. सध्या ढेपीचे दर शेतकऱ्यांच्या आवाक्यात आहेत. सरकी ढेप सध्या २२०० रु पये प्रतिक्विंटल मिळत आहे.
यंदा पाऊस चांगला असल्याने विहीर पाणी पातळी टिकून आहे. जनावरांना हिरवा चारा मोठ्या शेतकºयाला आपल्याच शेतात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असल्याने दूध उत्पादन चांगले होत आहे. यात निरंतर वाढ होत असून, तुलनात्मक खर्च कमी होत असल्याने दुधाचा व्यवसाय सध्या परवडत असल्याचे दुग्ध उत्पादक सांगतात.
येवला तालुक्यात अनेक ठिकाणी छोटे-मोठे चिलिंग प्लॅन्ट झाल्याने दूध नजीकच्या केंद्रावर पोहोचविणे शेतकºयांना सहज शक्य होत आहे. शहरी भागात देशी गायीच्या दुधाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे गीर गायी शहर परिसरात आता दिसू लागल्या आहेत.
देशी गायीच्या दुधाला पसंती
गीर अर्थात देशी गायीच्या दुधाला हवी ती किंमत द्यायला शहरी ग्राहक तयार आहेत, पण या दुधाचा तुटवडा असतो. या दुधाला ५० ते ६० रु पये प्रतिलिटर दर द्यायला तयार आहे. आता प्रत्येक वाडी-वस्तीवर दुभती जनावरे दिसू लागली असून, शेतकरी दुग्ध व्यवसायाला मोठी पसंती देऊ लागले आहेत.
शेतीला पूरक व्यवसाय असेल तरच शेती परवडते. हिरवा चारा घरीच असतो. ढेप आणली की चार दुभत्या गायी सांभाळणं सोपं असतं. त्यातून दोन पैसे मिळतात. प्रपंच चांगला चालतो.
- पंकज खोकले, दूध उत्पादक, आडगाव चौथा