गोंदे दुमाला येथील युवकाने मलेशियात फडकावला तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 18:44 IST2019-07-25T18:43:45+5:302019-07-25T18:44:08+5:30
नांदूरवैद्य: इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील वेदांत जाधव याने मलेशिया येथे पार पडलेल्या स्पार्टन रेस या धावण्याच्या स्पर्धेत नेञदिपक कामिगरी करु न अवघ्या १४ व्या वर्षी कांस्यपदकाला गवसणी घालत भारताचा तिरंगा मलेशियात फडकावत देशासह आपल्या गावाचे नाव मोठ्या अभिमानाने झळकवत नाशिक जिल्हयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

गोंदे दुमाला येथील युवकाने मलेशियात फडकावला तिरंगा
नांदूरवैद्य: इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील वेदांत जाधव याने मलेशिया येथे पार पडलेल्या स्पार्टन रेस या धावण्याच्या स्पर्धेत नेञदिपक कामिगरी करु न अवघ्या १४ व्या वर्षी कांस्यपदकाला गवसणी घालत भारताचा तिरंगा मलेशियात फडकावत देशासह आपल्या गावाचे नाव मोठ्या अभिमानाने झळकवत नाशिक जिल्हयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
मलेशियात २० तारखेला स्पार्टन रेस या क्रि डा प्रकारात त्याने भारताचे नेतृत्व केले असुन २० प्रकारचे अडथळे पार करतांना ५ किलोमीटर अंतरात उंच डोंगर पार करणे, उंच भिंत, दोर चढणे, तारेखालून फरफटने, नदी पार करणे, ३० किलो वजनासह ३०० मीटर धावणे, अशा खडतर अडथळा पार करीत नेञदिपक कामगिरी करत विजयश्री खेचुन आणली. वेदांत हा नाशिक येथील विजडम हायस्कूल गंगापूर रोड या शाळेत शिकत आहे.